‘न्यूट्रियंट्स’वर कारवाईच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 05:22 PM2017-08-24T17:22:12+5:302017-08-24T17:22:17+5:30
कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील न्यूट्रियंट्स (दौलत) ने साखर विक्रीबाबत जिल्हा बॅँकेला अद्याप तीन कोटी ६५ लाख रुपये दिलेले नाहीत. दोन्ही धनादेशांची तारीख संपली असून, बॅँकेच्या वतीने कंपनीवर कारवाई करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्हा बॅँकेला तारण दिलेली ११ हजार साखर पिशव्यांंची न्यूट्रियंट्स कंपनीने परस्पर विक्री केली आहे. याविरोधात बॅँकेने कंपनीवर गुन्हा दाखल केला.
साखर विक्री मान्य करून कंपनीने त्यातील ५० लाख रुपये बॅँकेकडे जमा करून दोन कोटी व एक कोटी ६५ लाख असे दोन धनादेश अनुक्रमे मंगळवार व बुधवार या तारखेचे कंपनीने बॅँकेला दिले होते.
कंपनीच्या संबंधित खात्यावर एवढी रक्कम नसल्याने बॅँकेच्या प्रशासनाने धनादेश खात्यावर जमा केले नसल्याचे समजते. आज, गुरुवारपर्यंत कंपनीने पैसे भरले नाहीत तर पुढील कारवाई केली जाणार आहे.
सोमवारनंतरच हालचाली
शुक्रवारपासून बॅँकेला सलग तीन दिवस सुटी आहे. त्यामुळे या रकमेबाबत बॅँक सोमवारनंतरच कारवाई करण्याची शक्यता आहे.
‘न्यूट्रियंट्स’ने धनादेश दिले असले तरी ते पैसे भरतो म्हटल्याने बॅँकेत वटविलेले नाहीत. गुरुवारपर्यंत वाट पाहू, नंतर निर्णय घेऊ.
- हसन मुश्रीफ (अध्यक्ष, जिल्हा बॅँक)