पन्हाळ्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाकडुन बंद, पर्यटकांची नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 03:00 PM2017-12-25T15:00:51+5:302017-12-25T15:01:23+5:30
ऐतिहासिक पन्हाळ गडावर पर्यटकांची गर्दी ही बारा महिने असतेच. सध्या नाताळ व सलग सुट्टीमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.
पन्हाळा- ऐतिहासिक पन्हाळ गडावर पर्यटकांची गर्दी ही बारा महिने असतेच. सध्या नाताळ व सलग सुट्टीमुळे पन्हाळगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला आहे.मात्र पन्हाळा येथे पुरातत्व विभागाने सज्जाकोठी, तीन दरवाजा, अंधारबाव, धान्याचे कोठार आदी महत्त्वाचे ऐतिहासिक वास्तू बंद केल्याने पर्यटकांना ऐन नाताळच्या सुट्टीतच ही ठिकाणे पाहता येत नसल्यामुळे आलेल्या पर्यटकांची निराशा झाली आहे.
कित्येक पर्यटकांनी यामुळे परतीचा रस्ता धरला आहे. अचानक झालेल्या पुरात्त्वविभागाच्या ऐतिहासिक वास्तू बंद करण्याच्या निर्यणामुळे मात्र गडावर सर्वत्र निराशा पसरली आहे.
चौथा शनिवार,रविवार त्यातच आज सोमवारी नाताळ सणाची सुट्टी त्यामुळे गडावर या तीन दिवसात सुमारे 70हजार पर्यटकांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रवासी कर व वाहन करात देखील मोठी वाढ झाली आहे.पन्हाळा येथील सर्वच ठिकाणे सलग सुट्टीमुळे गजबजुन गेली आहेत. तर काही परराज्यातील पर्यटकांनी सुट्टीमुळे पन्हाळा येथील हॉटेल्समध्ये मुक्काम ठोकला आहे. मात्र आज सकाळी पुरात्त्वविभागाने कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक सज्जाकोठी,अंधारबाब,तीन दरवाजा,धान्याचे कोठार आदी ठिकाणे पर्यटकांना पहाण्यास बंद केल्याने पर्यटकांच्यात नाराजी पसरली आहे. अचानक ऐन सु्ट्टीच्या मोसमातच या पुरात्त्वविभागाच्या अधिकारी वियज चव्हाण यांनी ऐतिहासिक वास्तू बंद करण्याचा निर्यण नेमका का घेतला यांचे उत्तर अजूनही समजलेलं नाही.
पन्हाळगडावर आज सकाळी झालेल्या या पुरात्त्वविभागाच्या मनमानी कारभारामुळे हैद्राबाद,कर्नाटक,गोवा,गुजरात,मध्यपद्रेश आदी परराज्यातील तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.तर तीन दरवाजा येथुनच तालुक्यातील पश्चिमभागाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.तीन दरवाजा बंद झाल्याने यामार्गवरील वाहतुक अचनाक बंद करण्यात आली.त्यामुळे वाहनधाकाकांच्यातुन येथील पुरात्त्वविभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता की रस्ता बंद का केला तर कर्मचाऱ्याच्यांकडुन उद्धगिरीची भाषा वापरली जात होती.असे अनेक वाहनधारकांच्यातुन सांगितले आहे.या प्रकारामुळे मात्र पर्यटनावर वपरित परिणाम झाला आहे.पन्हाळगडाला गालबोट लागले आहे.
आम्ही मुंबईवरुन गेल्या तीन दिवासापासून पन्हाळगडावर एका हॉटेलमध्ये राहत आहेत.आज सकाळी तीन दरवाजा येथे गेलो असता तीन दरवाजा बंद करण्यात आल्याने आम्हाला तीन दरवाजा पाहता आले नाही. ऐतिहासिक वास्तुच पहाता आली नसल्याने पुरात्त्वविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी मुंबईहून आलेल्या मंगेश नायर यांनी केली.