संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक एकत्र : अशोक चौसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:13 PM2017-09-21T16:13:45+5:302017-09-21T16:20:16+5:30

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी येथे केले.

All Marathi speakers gathered together on the occasion of Joint Maharashtra Movement: Ashok Chausalkar | संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक एकत्र : अशोक चौसाळकर

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक एकत्र : अशोक चौसाळकर

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वरूप व फलश्रुती’ असा व्याख्यानाचा विषयशिवाजी विद्यापीठातर्फे प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमाला

कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने सर्व मराठी भाषिक लोक प्रथमच एकत्र आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर यांनी येथे केले.


शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग आणि सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्रातर्फे आयोजित प्रभाकरपंत कोरगावकर स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ : स्वरूप व फलश्रुती’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. अरुण भोसले होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही तमाम मराठी भाषिकांनी जात, धर्म, पंथ, आदी भेद विसरून लढवलेली चळवळ होती. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निमिर्तीसाठी प्रामुख्याने शेकाप किंवा कम्युनिस्ट पक्षासारख्या डाव्या पक्षांनी मोठे योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेले लोक देखील मोठया संख्येने होते.


डॉ. भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे जितके श्रेय संयुक्त महाराष्ट्र समितीने केलेल्या चळवळीचे आहे. तितकेच श्रेय यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारणातील मुत्सदेगीरीला दयावे लागेल.

या कार्यक्रमास सामाजिकशास्त्रे विभागाच्या अधिष्ठाता प्रा. भारती पाटील, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रकाश पवार, रविंद्र भणगे, शिवाजी जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर, डॉ. निलांबरी जगताप, प्रा. य. ना. कदम, किशोर खिलारे, उमेश भोसले, शरद पाटील उपस्थित होते.

इतिहास विभागप्रमुख डॉ. नंदा पारेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अवनीश पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अविनाश भाले यांनी आभार मानले.

 

Web Title: All Marathi speakers gathered together on the occasion of Joint Maharashtra Movement: Ashok Chausalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.