पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:09 PM2017-07-24T18:09:38+5:302017-07-24T18:09:38+5:30
मंत्रालयात प्रदूषणासंदर्भात बैठक
आॅनलाईन लोकमत
मुंबई, दि. २४ : कोल्हापूरची पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले.
मंत्रालयात सोमवारी झालेल्या पंचगंगा नदी प्रदूषणासंदभार्तील बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.
कदम म्हणाले, नदीमध्ये सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, कारखान्यांचे प्रदूषित पाणी सोडणे यावर प्रदूषण विभागाने नियंत्रण ठेवले पाहिजे. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, कारखाना परिसर, ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावा.
प्लास्टीकच्या कॅरिबॅग वापरु नका, प्लास्टीक कॅरिबॅग बनविणारे कारखाने बंद करा, पर्यावरणासाठी प्राप्त निधीतून सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा निर्मूलन यावरच खर्च करण्याचे निर्देशही कदम यांनी दिले.
या बैठकीला कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.