पगारी पुजारी नियुक्ती; मंगळवारपासून मुलाखती एकाही विद्यमान पुजाऱ्याचा अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:08 AM2018-06-15T01:08:22+5:302018-06-15T01:08:22+5:30
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजाºयांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजाºयांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, त्या निर्णयाकडे पाठ फिरवत एकाही विद्यमान पुजाºयाने पगारी नियुक्तीसाठी अर्ज केलेला नाही. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने पुजारी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आलेल्या ११७ अर्जांमध्ये ६ महिलांचा समावेश आहे. या अर्जांच्या पार्श्वभूमीवर निवड प्रक्रिया कशी राबवायची यासाठी बुधवारी (दि. १३) मुंबईत बैठक घेण्यात आली.
श्री अंबाबाई मूर्तीला घागरा-चोली नेसवण्याच्या प्रकारानंतर कोल्हापुरात जनआंदोलन झाले आणि त्याची दखल घेत शासनाला मंदिरातील पारंपरिक पुजाºयांचे अधिकार संपुष्टात आणून पगारी पुजारी नियुक्तीचा कायदा करावा लागला. दि. २८ मार्चला दोन्ही सभागृहांनी त्यास मंजुरी दिली व दि. १२ एप्रिलला त्याचे गॅझेट झाले. मात्र, शासनाने अद्याप कायद्याची अधिसूचना (प्रसिद्धीकरण) दरम्यान, विधि व न्याय खात्याने देवस्थान समितीलाच स्वतंत्र समिती स्थापन करणे व पगारी पुजारी नियुक्तीची प्रक्रिया करण्यास सांगितले आहे. त्यानुसार समितीकडे आजवर ११७ अर्ज आले असून त्यात ६ अर्ज महिला उमेदवारांचे आहेत.
समितीने केलेल्या अभ्यासानुसार मंदिरात ११ प्रमुख पुजारी व ३५ सहाय्यक पुजारी अशा एकूण ५५ पुजारी व सेवेकºयांची आवश्यकता असल्यामुळे वरिष्ठतेनुसार मंगळवारपासून (दि. १९) तीन दिवस तीन टप्प्यात मुलाखती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सहा सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्यात धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषातज्ज्ञ प्रा. शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे व शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधीचा समावेश आहे. अंबाबाईच्या धार्मिक विधींचे ज्ञान असलेल्या अर्जदारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य देण्यात येणार असल्यामुळे सध्या अर्जांची छाननी सुरू आहे.
१) २ ते ३ शिफ्टमध्ये पुजाºयांची नियुक्ती
२) आगामी काळात मंदिर सुरक्षेसाठी १०० पोलीस, १०० सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर, वीज बचतीसाठी सोलर प्लँट.
३) कंट्रोल रूम नगारखान्यात
४) नव्या समितीसाठी जागेचा शोध
पुजाºयांना प्रशिक्षण
मुलाखतीद्वारे निवड झालेल्या पुजाºयांना देवीच्या धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अंबाबाईच्या नित्यपूजा विधींसह मंत्रपठण, धार्मिक विधी, साडी पेहराव, नैवेद्य, सण उत्सवातील विशेष पूजा, काकड आरतीपासून ते शेजारतीपर्यंतचे सर्व विधी त्यांच्याकडून करवून घेतले जातील. शिवाय संबंधित व्यक्तीचे सामाजिक जीवन, वर्तणूक, वयोमर्यादा, पावित्र्याचे पालन याची माहिती काढण्यात येणार आहे. त्या निकषाला पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी न्याय विधि खात्याला मंजुरीसाठी पाठविली जाईल. किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन दिले जाईल.