बाहुबली महामस्तकाभिषेक ; श्रवणबेळगोळमध्ये केवलज्ञान कल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:45 AM2018-02-12T02:45:19+5:302018-02-12T02:45:30+5:30

कर्नाटक येथील श्रवणबेळगोळमध्ये सुरू असलेल्या भगवान गोमटेश्वर बाहुबली यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये रविवारी भगवान आदिनाथ यांचा केवलज्ञान कल्याणक महोत्सव झाला. या वेळी उभारण्यात आलेले समवशरण हे सर्वांत मोठे आकर्षण होते.

 Bahubali Mahamastakabhishek; Eklavya Kalyanak Mahotsav in Shravanabelogol | बाहुबली महामस्तकाभिषेक ; श्रवणबेळगोळमध्ये केवलज्ञान कल्याणक महोत्सव

बाहुबली महामस्तकाभिषेक ; श्रवणबेळगोळमध्ये केवलज्ञान कल्याणक महोत्सव

googlenewsNext

कोल्हापूर / बाहुबली : कर्नाटक येथील श्रवणबेळगोळमध्ये सुरू असलेल्या भगवान गोमटेश्वर बाहुबली यांच्या महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये रविवारी भगवान आदिनाथ यांचा केवलज्ञान कल्याणक महोत्सव झाला. या वेळी उभारण्यात आलेले समवशरण हे सर्वांत मोठे आकर्षण होते.
रविवारी केवलज्ञान कल्याणक विधी पार पडला. या वेळी सर्वाण्ययक्ष पूजा करण्यात आली. संस्कार मंडपामध्ये दीक्षाकाळानंतरच्या या
सर्व प्रसंगाचा प्रतीकात्मक देखावा केला होता. त्याचे महत्त्व विविध मंत्रांतून, श्लोकांतून सांगण्यात आले. दैनिक नित्य अभिषेकानंतर मुनिराज आदिनाथ यांचा आहार विहार प्रतिष्ठाचार्य हसमुखजी यांनी केला.
समवशरणचे उद्घाटन भट्टारक पट्टाचार्य चारुकीर्ती महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सौधर्म भागचंद चुरीवाल व पत्नी सुनीता चुरीवाल (गुवाहटी, आसाम) यांनी नृत्य सादर केले. दुपारी १०८ विशुद्धसागर महाराज यांचे प्रवचन झाले. तसेच त्यांच्या ‘ज्ञानभवतरंगिनी’ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हा संपूर्ण ग्रंथ ताम्रपटावर तयार करण्यात आला आहे.
चारुकीर्ती महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली समवशरण -
८४ लक्ष जीवांमधून बाहेर पडण्यासाठी जैन धर्मामध्ये सर्व कर्मापोटी मोक्ष प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. ज्यावेळी तीर्थंकरांना केवलज्ञान प्राप्त होते, त्या वेळी समवशरण निर्माण होते. या समवशरणमध्ये चार विभाग असतात. यात चारही गतीतील जीव असतात आणि त्या सर्वांना तीर्थंकरांचा दिव्यध्वनी ऐकायला जातो, असे मानले जाते.

Web Title:  Bahubali Mahamastakabhishek; Eklavya Kalyanak Mahotsav in Shravanabelogol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.