कोल्हापुरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 03:20 PM2019-02-28T15:20:49+5:302019-02-28T15:24:31+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या यापूर्वी शिवसेनेने लढवल्या आहेत. त्यामुळे त्या जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी दिल्या.

Both the seats of Loksabha of Kolhapur belong to Shiv Sena, Uddhav Thackeray | कोल्हापुरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे

कोल्हापुरात जागा बदलण्याचा प्रश्नच नाही, दोन्ही शिवसेनेच्याच - उद्धव ठाकरे

Next
ठळक मुद्देकोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या यापूर्वी शिवसेनेने लढवल्या आहेत. त्यामुळे त्या जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारी दिल्या. तसेच, आमच्या जागा बदलणारी ही मंडळी कोण अशीही विचारणा त्यांनी केली. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. 

मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा कडवा विरोध आहे, त्यामुळे त्यांची जागा शिवसेनेने घ्यावी व कोल्हापूरची जागा भाजपाला द्यावी, असे प्रयत्न मुख्यत: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पातळीवर सुरू होते. आपल्या जिल्ह्यातील लोकसभेची एक तरी जागा आपल्या पक्षाकडे असावी असा त्यांचा प्रयत्न होता. भाजपाकडे ही जागा घेऊन तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना उभे करायच्या हालचाली भाजपाकडून सुरू होत्या. पण, उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने या हालचालींना ब्रेक लागला आहे.

मुंबईत मातोश्रीवर ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी तासभर चर्चा केली. आपण भाजपाशी युती का केली याचीही कारणमीमांसा त्यांनी यावेळी केली. कुठलेही हेवेदावे न ठेवता सर्वांनी कामाला लागा आणि कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार निवडून आणा, त्यासाठी पक्ष म्हणून जी मदत लागेल ती उभी करू अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.
 

Web Title: Both the seats of Loksabha of Kolhapur belong to Shiv Sena, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.