बसर्गेमध्ये सलग समतल चर कामाची सुरुवात
By admin | Published: April 26, 2017 06:22 PM2017-04-26T18:22:46+5:302017-04-26T18:22:46+5:30
सेवावर्धिनी संस्थेच्या जलदूत प्रकल्पासाठी निवड
आॅनलाईन लोकमत
गडहिंग्लज, दि. २६ : सेवावर्धिनी संस्थेतर्फे गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रूक गावच्या दहा हेक्टर गायरान जमिनीवर सलग समतल चर (सी.सी.टी) कामाची सुरुवात करण्यात आली.
सेवावर्धिनी संस्थेच्या जलदूत प्रकल्पाचे प्रमुख हर्षन पाटील यांच्या हस्ते या कामास प्रारंभ करण्यात आले. पुण्याच्या अॅटलास कॉप्को कंपनीच्या सी. एस. आर. निधीतून या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
या प्रसंगी बसर्गेचे उपसरपंच सुरेश मणिकेरी, जनसेवा बँकेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, अनुलोम संस्थेचे वस्तीमित्र विजय हिरेमठ, माजी सरपंच श्रीपतराव चौगुले, ग्रामपंचायत सदस्य काशाप्पा जोडगुुद्री आदी मान्यवर उपस्थित होते.
जलदूत प्रकल्प
सेवावर्धिनी संस्थेतर्फे गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या जलदूत प्रकल्पामध्ये बसर्गे गावचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या जलदूत म्हणून लता राजेंद्र हिरेमठ काम पहात आहेत. या जलदूत प्रकल्पाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा भाग म्हणून जल व मृद संधारणासाठी बसर्गे येथील ग्रामपंचायतीमधील गायरान माळावर सलग समतल चर या कामाला सुरुवात केली आहे.