शाहू समाधीप्रश्नी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:12 PM2019-05-31T17:12:06+5:302019-05-31T17:17:34+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बोलावण्यात आलेल्या व्यापक बैठकीत मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधीस्थळाच्या बांधकामप्रश्नी आज, शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बोलावण्यात आलेल्या व्यापक बैठकीत मोठा गदारोळ झाला. याप्रकरणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
राजर्षी शाहू समाधीस्थळाचे बांधकाम पूर्णत्वाकडे जात आहे. संरक्षक भिंतीचे काम सुरूअसताना सिद्धार्थनगरातील काही नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलला लागून एक प्रवेशद्वार करावे यासह अन्य काही मागण्या करत हे काम बंद पाडले, तर शाहू महाराज यांच्या समाधीचे काम असल्यामुळे यात कोणी आडवे पडू नये, अशी भूमिका महापालिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. गेल्या महिन्याभरापासून हे काम बंद आहे.
याप्रश्नी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासह कोल्हापुरातील शाहू भक्तांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती. परंतु दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मोठा गदारोळ झाला.
आम्ही शाहू -फुले-आंबेडकरांचा वारसा चालविणारे कोल्हापूरकर आहोत; त्यामुळे दोन जातींत तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. राजर्षी शाहू महाराज यांनी स्वत: आपली समाधी दलित समाजाच्या वसाहतीशेजारी असावी, असे सांगितले होते; त्यामुळेच ही समाधी नर्सरी बागेत होत आहे.
येथे शाहू महाराज यांचे वडील चौथे शिवाजी, मातोश्री आनंदीबाई यांची समाधी तर पुत्र प्रिन्स शिवाजी व करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराराणी यांची मंदिरे तेथे आहेत. यापूर्वी ताराराणींची संगमरवरी दगडाची मूर्ती कोणी अज्ञाताने फोडली आहे; त्यामुळे हा परिसर सुरक्षित राहिलेला नाही. म्हणूनच संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे देसाई यांनी सांगितले.
दोनवेळा संबंधित नागरिकांशी चर्चाही केली; परंतु काही मोजके लोक हटवादी भूमिका सोडायला तयार नाहीत; त्यामुळे अन्य पदाधिकाºयांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरु करण्यात येत आहे. संरक्षक भिंतीचे काम २६ जून या शाहू महाराज यांच्या जयंती दिनापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.