वनविभागाच्या नाक्यांवर आता सीसीटीव्हींचा ‘वॉच’ वृक्षतोडीवरही नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 09:57 PM2018-07-26T21:57:34+5:302018-07-26T21:58:26+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या
राजाराम कांबळे ।
मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या कॅमेरांद्वारे चाप बसणार आहे.
वनविभागाने करवीर, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, कागल या तालुक्यातील फुलेवाडी , साळवण, आंबा, बोरपाडळे , उचगांव, पाटणे, कागल, गैबी नाका आदी ठिकाणच्या चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. ज्या ठिकाणी महामार्गावर व राज्य मार्गावर वनविभागाचे चेकनाके आहेत. या प्रत्येक नाक्यांवर एक किंवा दोन कर्मचाºयांची नियुक्ती असते.
या नाक्यांवरून भरून जाणारी लाकडाचे ट्रक यांच्याजवळ असणाºया पास आहे किंवा नाही याची तपासणी केली जाते. त्या पासवर शिक्का मारून गाडी पुढे सोडली जाते. नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसल्यामुळे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतून होणारी चोरटी वृक्षतोडीची वाहतूक यावर नियंत्रण होणार आहे तसेच काही वनविभागाचे नाक्यावर ड्युटी असणारे कर्मचारी दिवसा थांबत नाहीत. अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या, सीसीटीव्हीमुळे कर्मचाºयांवर नजर ठेवली जाणार आहे .
लाकूड वाहतूक जेणेकरून रात्रीची होते. दिवसा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत दिवसा लाकडाची वाहतूक होते. नाक्यावर जर नेमणूक पाहिजे असेल तर मोठा अर्थपूर्ण व्यवहार होऊन बदली होते. नाक्यावर असणारा कर्मचारी हा साहेबांच्या मर्जीतला असतो. जिल्ह्याच्या आठ ठिकाणी चेकनाक्यांवर कॅमेरे बसविले असल्यामुळे महामार्गावरील वाहनांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे . या सीसीटीव्ही कॅमेºयांची सर्व माहिती डिव्हीजन आॅफिसला सर्व माहिती कनेक्ट केली गेली आहे. त्यामुळे चेकनाक्यांवर चाललेली हालचाल सीसीटीव्ही कॅमेºयांतून कैद होणार आहे. त्यामुळे दिवसादेखील कर्मचाºयांना नाक्यावर ड्युटी बजवावी लागणार आहे. नाक्याच्या आतील व बाहेरील सर्व व्हिडिओ चित्रण विभागीय कार्यालयांतून बसविलेल्या टीव्हीत दिसणार असल्यामुळे चोरट्या वृक्ष वाहतुकीला आळा बसणार आहे. किंमती लाकडाची चोरटी वाहतूक रात्री होते.
वनविभागाचे चेकनाके राज्य व महामार्गावर आहेत. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. चोरी व लुटालूट करून जाणारे चोरटे या सीसीटीव्हीमध्ये सापडले जाणार आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी मदत होणार आहे. एखाद्या घटनेविषयी तातडीने पोलिसांना फुटेज पाहता येणार आहे . महामार्गावर होणाºया लूटमारीला आळा बसणार आहे.सीसीटीव्हीमुळे पोलिसांना मदत-वनविभागाने जिल्ह्याच्या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर आठ ठिकाणी चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेºयांमुळे महामार्गावर होणारी वाहनधारक, प्रवाशांची, लूटमार तसेच संशयितांच्या हालचाली व गुन्हेगारांना पकडणे सोयीस्कर ठरणार आहे.
वनविभागाच्या चेकनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे नाक्यांत व नाक्यांबाहेर रस्त्यावर घडणाºया घटना व कर्मचाºयांच्या हालचालींवर नियंत्रण राहणार आहे तसेच चोरट्या लाकडाच्या वाहतुकीला आळा बसणार आहे.
- प्रभुनाथ शुक्ल,
उपवनसंरक्षक, वनविभाग कोल्हापूर