क्राफ्टी किडस छंदवर्गास प्रारंभ
By admin | Published: May 8, 2017 06:50 PM2017-05-08T18:50:26+5:302017-05-08T18:50:26+5:30
दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमार्फत आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमार्फत क्राफ्टी किडस या आठ दिवसांच्या छंदवर्गास सोमवारी प्रारंभ झाला. या वर्गात सुमारे ३0 विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
लहानपणी मोठ्ठं व्हावंसे वाटतं आणि एकदा मोठ्ठं झालो की, लहानपणीतील सुट्टी कशी अनुभवली ते दिवस अविस्मरणीय बनतात. अशा दिवसांना अनुभवण्यासाठी क्राफ्टी किडस या छंदवर्गाचे आयोजन दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमार्फत करण्यात आले आहे. या सात दिवसीय छंदवर्गात चित्रकलेची मुलभूत तत्वे, मातीकाम, घडीकाम, हस्तकला, टाकाउतून टिकाउ तसेच लघुपट आणि माहितीपट यांच्या माध्यमातून चित्रकलेवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
इको फ्रेन्डली उद्देश डोळ्यासमोर ठेवून दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटच्या अभिजात कला शाखेमध्ये हा छंदवर्ग दि. १४ मे पर्यंत सकाळी ९ ते १२ या वेळेत सुरु राहणार आहे. पहिल्याच दिवशी ३0 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात हा छंदवर्ग सुरु आहे.
या छंदवर्गासाठी आकाश झेंडे, पुष्पक पांढरबळे, अनिशा पिसाळ, अभिषेक संत, प्रतिक्षा व्हनबट्टे, दुर्गा आजगांवकर, शुभम चेचर यांनी परिश्रम घेतले.