चंद्रकांतदादा निष्क्रिय शरद पाटील यांची टीका

By Admin | Published: June 5, 2014 01:02 AM2014-06-05T01:02:12+5:302014-06-05T01:35:59+5:30

पदवीधरचे रणांगण तापले

Criticism of Chandrakant Dada Sharad Patil | चंद्रकांतदादा निष्क्रिय शरद पाटील यांची टीका

चंद्रकांतदादा निष्क्रिय शरद पाटील यांची टीका

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांत चंद्रकांतदादा पाटील यांनी पदवीधर, शिक्षकांसाठी काहीच केले नसून त्यांच्यासारखा निष्क्रिय प्रतिनिधी नसल्याची टीका डावे लोकशाही पक्षाचे पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. प्रा. पाटील म्हणाले, आजपर्यंत समाजवादी मार्गाने वाटचाल सुरू ठेवली आहे. दहा वर्षे विधानसभा व पाच वर्षे विधान परिषदेमध्ये काम करताना पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. शेतकरी व शेतमजुरांच्या पेन्शनसाठी कोल्हापूर ते नागपूर अशी संघर्ष यात्रा काढली. या मतदारसंघावर भाजपचे प्राबल्य राहिल्याची मानसिकता कॉँग्रेस-राष्टÑवादीने केल्याने त्यांच्याविरोधात लढण्यास तयार नव्हते. २००२ ला पहिल्यांदा प्रकाश जावडेकर यांना आव्हान देत विजय संपादन केला. गेल्या निवडणुकीत पुरोगामी मतांची विभागणी झाल्याने भाजपला संधी मिळाली. गेल्या सहा वर्षांत चंद्रकांत पाटील यांनी आर. एस. एस. व भाजपच्या पलीकडे काहीच केले नाही. ‘आर.एस.एस.च्या गोटातील आमदार’ एवढीच त्यांची ओळख दाखविली. त्यामुळे पदवीधर नाराज आहेत, अशा निष्क्रिय माणसांना पदवीधर थारा देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर, रिपाइं (खोब्रागडे), रिपाइं (सेक्युलर), सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी व समाजवादी जन परिषद या पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून पदवीधरांसमोर जात असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. जनता दलाचे प्रधान महासचिव प्रताप होगाडे, राज्य महासचिव राजन मुढाणे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण सोनाळकर, मधुकर पाटील, रवी जाधव, चंद्रकांत यादव, आदी उपस्थित होते. मतदानादिवशी सुटी द्या पदवीधर मतदारसंघासाठी २० जूनला मतदान होत आहे. त्या दिवशी शुक्रवार असल्याने नोकरदार मतदारांची अडचण होणार आहे. एकतर घरापासून मतदान केंद्रे १५ ते २० किलोमीटर दूर असल्याने या वेळेत जायचे कसे? असा पेच आहे. शिक्षकांना दोन ठिकाणी मतदान करावे लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यादिवशी सुटी जाहीर करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Criticism of Chandrakant Dada Sharad Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.