कोल्हापूरच्या अंबाबाईचा सुवर्ण पालखी प्रदक्षिणा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:55 AM2017-09-22T11:55:24+5:302017-09-22T11:58:55+5:30

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. यंदाच्या नवरात्रौत्सवात देवीला सुवर्ण पालखीत विराजमान करुन तिची मंदिर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली. हजारो भाविकांना सुवर्ण पालखीचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.  

The crowd of devotees to see the Golden Palak Pradakshina Ceremony of Ambabai of Kolhapur | कोल्हापूरच्या अंबाबाईचा सुवर्ण पालखी प्रदक्षिणा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी  

कोल्हापूरच्या अंबाबाईचा सुवर्ण पालखी प्रदक्षिणा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी  

googlenewsNext

कोल्हापूर, दि. 22 - करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. यंदाच्या नवरात्रौत्सवात देवीला सुवर्ण पालखीत विराजमान करुन तिची मंदिर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली. हजारो भाविकांना सुवर्ण पालखीचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.  हजारो भाविकांनी केलेल्या सुवर्णदानातून 2 वर्षात ही पालखी तयार करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापुरात नऊ दिवस देवीचा पालखी सोहळा असतो. यापुढे आता सुवर्ण पालखीतूनच मिरवणूक काढण्यात येणार आहे. 

यापूर्वी लाकडी पालखीतून देवीची पालखी निघत असे. मात्र यंदा सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा घालण्यात आली. रात्री साडेनऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पालखी प्रदक्षिणा सोहळा सुरू झाला. यावर्षी प्रथमच देवीच्या पालखी सोहळ्यासाठी सुवर्णपालखी वापरली जाणार असल्याने करवीरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळेच पालखी सोहळ्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाले होते. दरम्यान, भाविकांची संख्या पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये व त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

Web Title: The crowd of devotees to see the Golden Palak Pradakshina Ceremony of Ambabai of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.