दत्ता जाधव आता मिरज पोलिसांकडे

By admin | Published: November 18, 2014 08:52 PM2014-11-18T20:52:15+5:302014-11-18T23:31:50+5:30

रेल्वे दरोडा प्रकरण : ‘अपूर्वा’ प्रकरणात आणखी चौघांना अटक

Datta Jadhav now meets Miraj police | दत्ता जाधव आता मिरज पोलिसांकडे

दत्ता जाधव आता मिरज पोलिसांकडे

Next

सातारा : खेड येथील ‘अपूर्वा कन्स्ट्रकशन्स’ दरोडाप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दत्ता जाधव याला मंगळवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याची रवानगी कारागृहात झाल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा त्याला मिरज पोलिसांनी रेल्वे दरोड्याच्या प्रकरणात ताब्यात घेतले. या दरोडा प्रकरणाविषयी पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, ‘अपूर्वा कन्स्ट्रकशन्स’ दरोडाप्रकरणी दरोडा प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सोमवारी रात्री चौघांना अटक केली. अक्षय सुनील जाधव (वय १९, रा. बसप्पा पेठ, सातारा), संतोष शिवाजी सालकर (वय २५, रा. खेड, सातारा), मयूर अरुण गवळी (वय २२, रा. एसटी कॉलनी, शाहूनगर, सातारा), आकाश विठ्ठल राठोड (वय १८, रा. लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २६ आॅक्टोबर रोजी रात्री दत्तात्रय रामचंद्र जाधव आणि तीस ते चाळीसजण ‘अपूर्वा कन्स्ट्रकशन्स’मध्ये आले. येथे रखवालदार सागर पाटेकर (वय २९, रा. लिंब गोवे, ता. सातारा) याला दत्ता जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘तुमचा मालक शिंदेनी पैसे दिले नाहीत. मला भेटला नाही’ अशी विचारणा करतच बाहेरच असणाऱ्या मोटारसायकलची मोडतोड केली आणि भिंत पाडली.
यावेळी संतोष लोहार, संतोष निकम यांच्याजवळील मोबाईल आणि रोकड असा तीन हजार रुपयांचा ऐवज नेला होता. याप्रकरणी दत्ता जाधवला अटक करण्यात आली. त्यानंतर सोमवारी रात्री आणखी चौघांना शहर पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणात दत्ता जाधवला पोलीस कोठडी मिळाली. त्याची सुनावणी मंगळवारी झाली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्याची रवानगी कारागृहात झाल्यानंतर त्याला मिरज पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आणि मिरजकडे रवाना झाले.
दरम्यान, दत्ता जाधवला ताब्यात घेतल्यानंतर मिरज पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला.(प्रतिनिधी)

संदीप जाधवच्या कोठडीत वाढ
सातारा तालुक्यातील गोवे येथील संतोष निकम, संतोष लोहार, सागर पाटेकर अपहरणप्रकरणात संशयित म्हणून अटक केलेल्या संदीप जाधवला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. मात्र, मंगळवारी त्याची पोलीस कोठडी आणखी एका दिवसांने वाढवून ती चार दिवस केल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

Web Title: Datta Jadhav now meets Miraj police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.