जि. प. अध्यक्षपदी अरुण इंगवले यांना संधी देणार : हिंदुराव शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:57 AM2018-06-27T00:57:00+5:302018-06-27T00:58:31+5:30

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांचा राजीनामा देण्याबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे

District Par. Arun Ingewal will be given the opportunity to be elected as president: Hindu Rao Shelke | जि. प. अध्यक्षपदी अरुण इंगवले यांना संधी देणार : हिंदुराव शेळके

जि. प. अध्यक्षपदी अरुण इंगवले यांना संधी देणार : हिंदुराव शेळके

googlenewsNext
ठळक मुद्दे राजीनाम्याबाबत महाडिक यांच्याशी चर्चा ; राजकीय घडामोडी तापल्या

इचलकरंजी-कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक यांचा राजीनामा देण्याबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांना अध्यक्षपदी संधी दिली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. भाजपच्या जिल्हाध्यक्षांनीच पुन्हा अध्यक्ष बदलाची घोषणा केल्यामुळे जिल्हा परिषदेतील राजकीय घडामोडी पुन्हा तापणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्यावतीने अनेक प्रभावी नेत्यांना पक्षात समाविष्ट करून घेतले होते. त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील राष्टÑवादीचे नेते अरुण इंगवले यांचाही समावेश आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इंगवले यांना त्यावेळी अध्यक्ष करण्याचा ‘शब्द’ दिला होता. मात्र, निवडणूक निकालानंतर सत्तास्थापन करण्यासाठी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी सव्वा वर्षांचा कालावधी ठरविण्यात आला. त्यावर एकमत होऊन जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची सत्ता आली.
अध्यक्षपदाला दीड वर्षांचा कालावधी लोटला असल्याने अध्यक्ष बदलाच्या कारणावरून अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे शौमिका महाडिक यांच्या राजीनाम्याबाबत महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी राजीनामा देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री पाटील व भाजप सदस्य आणि मित्रपक्ष यांच्याशी चर्चा करून इंगवले यांना अध्यक्षपदी संधी देण्यात येणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत भाजपचे काठावर बहुमत आहे. त्यात सत्तारुढ आघाडीतील राहुल आवाडे गट व खासदार राजू शेट्टी हे देखील नाराज आहेत. महाडिक यांनी राजीनामा दिलाच तर भाजपचाच अध्यक्ष करताना अडचणी येतील म्हणून स्वत: पालकमंत्री पाटील यांनीच या घडामोडींना मध्यंतरी चाप लावला होता. विधानसभेची निवडणूक होईपर्यंत महाडिक कुटुंबियांनाही हे सत्तेचे पद आपल्याकडेच पाहिजे आहे; परंतू त्यातूनही भाजपने राजीनामा मागितला आणि पायउतार व्हावे लागले तर नंतरच्या राजकीय घडामोडीत महाडिक भाजपसोबत कितपत राहतील याबद्दलही भाजप नेत्यांना साशंकता आहे. त्यामुळे त्यांनीच या बदलालाच बगल दिली आहे. या पार्श्वभूमीवर शेळके यांचे विधान खळबळ उडवून देणारे ठरले आहे.

 

Web Title: District Par. Arun Ingewal will be given the opportunity to be elected as president: Hindu Rao Shelke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.