पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:52 AM2017-07-24T00:52:07+5:302017-07-24T00:52:07+5:30

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

Flood survival; The level of Panchaganga came down | पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला. पंचगंगेची पातळी कमी होऊन ४१ फूट ३ इंचांवर आली असली तरी पूरस्थिती कायम आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने राधानगरी धरण ९२ टक्के भरून २२०० क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम होती. पंचगंगेची पातळी इंचइंचाने कमी होत असली तरी पसरलेले पाणी रस्त्यांवर असल्याने अद्याप राज्यमार्गांसह अन्य ३१ मार्ग बंद असून, ५५ बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. रविवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांत १७९.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३१.५० मि.मी. पाऊस पडला. त्याखालोखाल आजरा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत पाऊस झाला. धरणक्षेत्रातील पावसाने रविवारी राधानगरी धरणामध्ये भर पडून ते ९२ टक्के भरले. येथून २२०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी रविवारी दिवसभरात इंचाइंचाने कमी झाली. यामध्ये शनिवारी (दि. २२) धोक्याच्या पातळीजवळ ४१ फूट ९ इंचांवर असलेली पंचगंगेची पातळी कमी होऊन ती रविवारी सायंकाळी सहापर्यंत ४१ फूट ३ इंचांवर आली. अद्याप पाणी धोक्याच्या पातळीजवळ असल्याने पूरस्थिती कायम आहे.
एस.टी.चे २९ वाहतूक मार्ग बंद
अतिवृष्टीने जिल्ह्यातील २९ मार्गांवरील एस. टी. बसची वाहतूक अंशत: तसेच पूर्णत: बंद करण्यात आली असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, गारगोटी-सावर्डे, गारगोटी-बाचणी, गारगोटी-केळेवाडी, गारगोटी-मालवाडी, मलकापूर-गावडी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-रंकाळा, रंकाळा-बावेली, रंकाळा-कुंभवडे, रंकाळा-चौके, रंकाळा-बुरंबाळ, रंकाळा-स्वयंभूवाडी, रंकाळा-गगनबावडा, रंकाळा-अणुस्कुरा, रंकाळा-गुडाळ, रंकाळा-भोगावती, रंकाळा-तारळे, इचलकरंजी-कागल, इचलकरंजी-बोरगाव, कागल-बस्तवडे, कागल-नंद्याळ, कागल-इचलकरंजी, राधानगरी-तारळे, राधानगरी-शिरगाव, गगनबावडा-कोल्हापूर, गगनबावडा-धुंदवडे या मार्गांवरील वाहतूक अंशत: व पूर्णत: बंद झाली आहे.
पावणेपाच लाखांचे नुकसान
कागल, भुदरगड, शाहूवाडी, करवीर, राधानगरी तालुक्यांत पावसामुळे पक्क्या व कच्च्या घरांसह जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन १९ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे ४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात ४०८.२५
मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रविवारी सकाळी आठपर्यंत १७९.०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ३१.५० मि.मी., राधानगरीमध्ये २०.३३ मि.मी., चंदगडमध्ये २३.८३ मि.मी., आजऱ्यात २६.५० मि.मी., कागलमध्ये ५.७१ मि.मी., शाहूवाडीत २३.३३ मि.मी., भुदरगडमध्ये १२.०० मि.मी., हातकणंगलेमध्ये २.८७ मि.मी., शिरोळमध्ये १.८५ मि.मी., पन्हाळ्यात २४.५७ मि.मी., करवीरमध्ये ४.५४ मि.मी., गडहिंग्लज मध्ये २.०० मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातील ३१ मार्ग बंद
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाच राज्यमार्गांसह नऊ प्रमुख जिल्हा, १२ इतर जिल्हा व पाच ग्रामीण असे ३१ मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये चंदगड-इब्राहिमपूर-चितळे-शिगरवाडी-आजरा, कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-चंदगड, कोल्हापूर-चिखली-यवलूज-पुनाळ-बाजारभोगाव-करंजफेण, आदी प्रमुख राज्यमार्ग; शेणवडे-अणदूर-धुंदवडे-राशिवडे, येवती-बाचणी-साके-सावर्डे, आकनूर-खिंडी व्हरवडे-गुडाळ-तारळे-पडसाळी-गारिवडे, आदी प्रमुख जिल्हा मार्ग, शाहूवाडी-कोळगाव-टेकोली-पणुंद्रे, कुडित्रे-वाकरेपाटी-खुपिरे-शिंदेवाडी, कोल्हापूर-वाघाची तालीम उत्तरेश्वर पेठ-शिंगणापूर, आदी इतर जिल्हा मार्ग व शिरोळ-सोंडमोळी, आरे-सावरवाडी, म्हसवे-गारगोटी, इचलकरंजी-चंदूर-रुई, तिसंगी-टेकवाडी, आदी ग्रामीण मार्गांचा समावेश आहे.

Web Title: Flood survival; The level of Panchaganga came down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.