विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांसाठी मुख्याध्यापकांचे ‘आत्मक्लेश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 11:28 PM2017-10-26T23:28:11+5:302017-10-26T23:40:26+5:30

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्याध्यापक आणि राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे

Headmasters 'self-doubt' for unaided schools | विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांसाठी मुख्याध्यापकांचे ‘आत्मक्लेश’

विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांसाठी मुख्याध्यापकांचे ‘आत्मक्लेश’

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारचे लक्ष वेधण्यासाठी लढा;नोव्हेंबरमध्ये पुुन्हा राज्यभर आंदोलनप्रत्यक्षात ते प्रचलित नियमानुसार मिळालेले नाही

कोल्हापूर : विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुख्याध्यापक आणि राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांचे गेल्या अडीच महिन्यांपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे.

अघोषित शाळांना घोषित करून त्वरित अनुदान द्यावे, दि. १ व २ जुलै रोजीच्या घोषित शाळांना त्वरित अनुदान घोषित करावे, २० टक्के अनुदानप्राप्त शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी गेल्या १७ वर्षांपासून विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचारी लढा देत आहेत. यात सरकारने शाळांना २० टक्के अनुदान जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात ते प्रचलित नियमानुसार मिळालेले नाही. त्यासह अन्य मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक पावले पडलेली नाहीत.

त्यामुळे या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी ११ आॅगस्टपासून अनवाणी राहून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. मौजे आगर (ता. शिरोळ) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या १९ वर्षांपासून मुख्याध्यापक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला जिल्'ातील सर्व विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, कर्मचाºयांनी या वर्षीच्या शिक्षकदिनी काळ्या फिती लावून आणि चप्पल न घालता काम करून पाठिंबा दिला.

आतापर्यंत १४२ आंदोलने
या प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी कृती समितीद्वारे आतापर्यंत विविध प्रकारची १४२ आंदोलने केली आहेत. मात्र, अजूनही विनाअनुदानित शाळा तेथील शिक्षक आणि कर्मचारी यांना योग्य तो न्याय मिळालेला नसल्याचे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष जगदाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, या मागण्यांबाबत नोव्हेंबरमध्ये कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. विनाअनुदानित शिक्षक, कर्मचाºयांना न्याय मिळेपर्यंत आत्मक्लेश आंदोलन सुरू राहणार आहे.


 

 

Web Title: Headmasters 'self-doubt' for unaided schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.