पोलो मैदानात आजपासून घोडेस्वारीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:41 AM2018-03-03T00:41:05+5:302018-03-03T00:41:05+5:30

 Horse Rage from Polo Maidan Today | पोलो मैदानात आजपासून घोडेस्वारीचा थरार

पोलो मैदानात आजपासून घोडेस्वारीचा थरार

googlenewsNext

कोल्हापूर : संस्थानकाळापासून कोल्हापूरमध्ये अनेक खेळांना राजाश्रय मिळाला आहे. या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘रॉयल कोल्हापूर हॉर्स शो’आयोजित करण्यात आला आहे. हा घोडेस्वारीचा थरार करवीरकरांना आज, शनिवार व रविवार (दि. ५) असे दोन दिवस न्यू पॅलेसच्या पोलो मैदानावर पाहता येणार आहे.

यामध्ये अनेक व्यावसायिक, नवोदित घोडेस्वार (जॉकी) सहभागी होणार आहेत. त्यामध्ये जम्पिंग अरेना, जिमखाना अरेना, टेंट पेगिंग असे साहसी प्रकार असणार आहेत. घोडेस्वारी हा क्रीडा प्रकार नव्या पिढीला समजावा व कोल्हापूरच्या हॉर्स रायडिंग खेळाचा इतिहास लोकांसमोर यावा यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी या ‘शो’चे उद्घाटन शाहू छत्रपती व एअरमार्शल अजित भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, आदी मान्यवर उपस्थित राहणार
आहेत.

Web Title:  Horse Rage from Polo Maidan Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.