जयसिंगपूर पालिका देणार कचºयासाठी घरोघरी कुंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:26 PM2017-11-02T23:26:02+5:302017-11-02T23:31:20+5:30
जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
संदीप बावचे ।
जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या (डस्टबिन) देण्याचे नियोजन केले आहे. गांडूळ खत प्रकल्प राबविण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा केला
जाणार असून, मिळणाºयास्वतंत्र ओल्या कचºयातून खताची निर्मिती केली जाणार आहे. कचराकुंड्यांसाठी निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.कचराकुंड्यांसाठी निविदा
नगरपालिकेकडे घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरामध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प राबवावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा नियमांतर्गत घनकचरा विलगीकरण मोहीम सुरू करावी, असे शासनाचे परिपत्रक पालिकेला आले आहे. त्यामुळे पालिका सभेत चिपरी येथील कचरा डेपोच्या जागेवर गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प राबविण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात दररोज १७ टन कचरा संकलित केला जातो. यामध्ये अंदाजे १० टन ओल्या कचºयाचा समावेश आहे.
खत प्रकल्पासाठी ओल्या कचºयाची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आणि खत प्रकल्पाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिका मोहीम राबविणार आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या दिल्या जाणार आहेत. गेल्या दहा वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. उपनगरांमुळे आरोग्य विभागासमोर कचरा उठाव करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, तुंबलेल्या गटारींच्या स्वच्छतेचे आव्हान पालिकेसमोर आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छतेबाबत पालिकेकडे तक्रारी येतात. शासनाचे उद्दिष्ट आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कचराकुंड्या देण्याबाबत निविदा काढण्यात आली आहे. घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या दृष्टिकोनातून कचराकुंड्या नागरिकांना दिल्या जाणार असून, घंटागाड्याद्वारे शहरातील कचरा संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे.
पालिकेची जबाबदारीस्वच्छ महाराष्ट्रांतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार स्वीकारल्यानंतर जयसिंगपूर पालिकेची जबाबदारी वाढली आहे. ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प पालिकेने यापूर्वीच हाती घेतला आहे. मात्र, शहरातील कचºयाच्या प्रश्नाचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. मंगळवारी झालेल्या पालिका सभेत कचरा, मोकाट जनावरे यावरून नगरसेवकांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
प्रबोधनाची गरज
कचराकुंड्यांबरोबर ओला व सुका कचरा नेमका काय ? याची चित्रासह माहिती असणारी पत्रके वितरित करण्याची गरज आहे. शिवाय ओला कचरा गोळा करणाºया घंटागाड्यांचे नियोजनदेखील महत्त्वाचे आहे. तरच हे अभियान यशस्वी होईल.
स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत पालिकेला मिळालेल्या निधीतून सुमारे ३५ लाख रुपये कचराकुंड्यांसाठी खर्च केले जाणार आहेत. गांडूळ खत प्रकल्पासाठी शहरातून ओला कचरा संकलित केला जाणार आहे.
- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी जयसिंगपूर