यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, हिंमत हवी
By Admin | Published: January 9, 2017 11:31 PM2017-01-09T23:31:50+5:302017-01-09T23:31:50+5:30
सोहेल शर्मा : सायरस पूनावाला इंटरनँशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन
पेठवडगाव : जिद्द, चिकाटी आणि हिंमत दाखविली, तर कोणतेही शिखर सहज सर करता येते. यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्यातील अंगभूत गुणांचा सदुपयोग करून स्पर्धेला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सोहेल शर्मा यांनी केले.
येथील डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, विद्या पोळ, विजयादेवी यादव, अनिता चव्हाण, प्राचार्य सरदार जाधव उपस्थित होते.
यावेळी गुलाबराव पोळ म्हणाले, सवर्सामान्य विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देत असताना शाळेची प्रत्येक संकल्पना यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन पालक, तसेच शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत.
याप्रसंगी आदर्श विद्यार्थी पुरस्कार अक्सा अरीफ सर्जेखान, अद्वैत अजित कदम, प्रणोती प्रमोद हिरवे, अक्षय अनिल म्हेतर यासह आदर्श पालक पुरस्कार - प्रकाश संतानी, राजेंद्र देवस्थळी, डॉ. सतीशकुमार मडके, गंगाधर मोरे, संतोष तेरणीमठ, आदींची निवड करण्यात आली.
उपप्राचार्य स्नेहल नार्वेकर, संगीता मिरजकर, भीमा गोणी,
डॉ. माधवी सावंत, कुबेर पाटील, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार पाटील, अस्मिता पाटील, साक्षी कांबळे, सारा भोसले, शारदा मोरे, स्वस्तिक मडके या विद्यार्थ्यांनी केले, तर सरदार जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)
पेठ वडगाव येथे डॉ.सायरस पूनावाला इंटरनँशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे दीपप्रज्वलन विद्या पोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी गुलाबराव पोळ, विद्या पोळ, विजयादेवी यादव, सरदार जाधव, आदी उपस्थित होते.