कोल्हापूर : क्रिकेटविश्वाचे अनोखे प्रदर्शन ‘ ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ ४ पासून बाळ पाटणकर; रोहन पाटे- कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:54 PM2018-01-24T18:54:22+5:302018-01-24T19:01:51+5:30
सचिन तेंडुलकरच्या बॅटपासून टी-शर्ट, सर डोनाल्ड ब्रॅडमन, विराट कोहली, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा, रिचर्ड असा क्रिकेटमधील दिग्गजांनी वापरलेल्या क्रिकेट साहित्याचे संग्राहक रोहन पाटे यांचे ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ हे अनोखे प्रदर्शन ४ ते १० फेबु्रवारीदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत शाहू स्मारक भवनात आयोजित केले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी बुधवारी दिली.
कोल्हापूर : सचिन तेंडुलकरच्या बॅटपासून टी-शर्ट, सर डोनाल्ड ब्रॅडमन, विराट कोहली, सनथ जयसूर्या, ब्रायन लारा, रिचर्ड असा क्रिकेटमधील दिग्गजांनी वापरलेल्या क्रिकेट साहित्याचे संग्राहक रोहन पाटे यांचे ‘ब्लेड्स आॅफ ग्लोरी’ हे अनोखे प्रदर्शन ४ ते १० फेबु्रवारीदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत शाहू स्मारक भवनात आयोजित केले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी बुधवारी दिली.
सचिन तेंडुलकरच्या बॅटपासून त्याने विश्वचषकामध्ये वापरलेल्या टी-शर्टपर्यंत, सर डोनाल्ड ब्रॅडमन यांची खेळलेली बॅट, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीपासून सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरनने विक्रम रचलेला चेंडू, पॅड, ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवाग, मायकेल क्लार्क, माहेला जयवर्धने, ख्रिस गेल यांच्या बॅट्स, सौरभ गांगुली, कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, पीटरसन, मार्क वॉ, अॅलन बोर्डर, डेसमंड हेन्स, गार्डन ग्रिनीज यांनी स्वाक्षरी केलेल्या क्रिकेटविषयक वस्तू, माल्कम मार्शलची टोपी, रिचर्डची जर्सी, डेव्हिड बूनचा टी-शर्ट, जावेद मियॉँदादची स्वाक्षरी असलेली बॅट, राहुल द्रविड , कॅलिस, पाँटिंग यांच्या क्रिकेट वापरातील वस्तू, पाकिस्तानचा सईद अन्वरने भारताविरु द्ध चेन्नई येथे केलेल्या १९४ धावांची बॅट, विश्वचषक २०१५ मध्ये वापरलेले बॉल, बॅट, स्मृतिचिन्हे अशा ५०० हून अधिक वस्तूंचा या प्रदर्शनात समावेश आहे. यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व तडाखेबाज क्रिकेटपटू विराट कोहली यांनी ज्या बॅटच्या मदतीने धावांचा पाऊस पाडला, त्या बॅटसमवेत छायाचित्र काढण्यासाठी सेल्फी पॉइंटही या प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.
या प्रदर्शनात कोल्हापूरकर ज्येष्ठ खेळाडूंच्या संग्रहातील क्रिकेट बॅट, दुर्मिळ छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, वस्तू यांचाही समावेश केला जाणार आहे. तरी या वस्तू क्रिकेटप्रेमींनी असोसिएशनकडे आणून देऊन त्याही प्रदर्शित करण्याची संधी असोसिएशनला द्यावी, असे आवाहनही पाटणकर यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्ष चेतन चौगुले, सचिव रमेश कदम, सहसचिव अभिजित भोसले, बापूसाहेब मिठारी, नितीन पाटील, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, आदी उपस्थित होते.