कोल्हापूर : श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात, पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक डोंगरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:40 PM2018-02-05T14:40:22+5:302018-02-05T14:45:17+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील व पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात झाली आहे. ३० मार्चला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पूर्वी या खेट्यांना मोठे महत्त्व आहे.
पन्हाळा (कोल्हापूर) : पन्हाळा तालुक्यातील (कोल्हापूर) श्रीक्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना सुरवात झाली आहे. ३० मार्चला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पूर्वी या खेट्यांना मोठे महत्त्व आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकही या खेट्यांच्या दिवशी जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. मुख्य चैत्र यात्रेच्या पूर्वी रविवारी ज्योतिबाचे दर्शन घेणे याला मोठे धार्मिक महत्त्व आहे.
हेच खेटे पूर्ण झाल्यानंतर मुख्यत्वे यात्रेमध्ये हा भाविक 'जोतिबाच्या नावानं चांगभलं'चा गजर करत सहभागी होतो. यावेळी जोतिबाच्या डोंगरावर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली जाते.
आजपासून खेट्यांना सुरुवात झाली असली तरी चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगरावर ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडूनही आता यात्रेची तयारी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पन्हाळा शहर आणी परीसरातुन जोतीबा खेटे पुर्ण करण्यासाठी मोठ्या संख्येने भावीक डोंगरावर चालत गेले होते यात पन्हाळा तहसिलदार रामचंद्र चोबे यांनीही खेटा पायी चालत पुर्ण केला.