कोल्हापूर : कॅन्सर सेंटर रुग्णालयात सव्वा कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:57 PM2018-06-26T18:57:46+5:302018-06-26T19:00:12+5:30
गोकुळ शिरगाव येथील कॅन्सर सेंटर रुग्णायातील अकाऊंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील कॅन्सर सेंटर रुग्णायातील अकाऊंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी रुग्णालयाचे अकाऊंट व्यवस्थापक अजय आनंदराव खोत (रा. लाईन बाजार, कसबा बावडा), किरण शिंदे (रा. कोडोली, ता. पन्हाळा), प्रविण दत्तात्रय आळतेकर (रा. माळवाडी, दानोळी, ता. शिरोळ) यांचे विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २५) फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, डॉ. सुरज भास्करराव पवार (वय ४८, रा. माळी कॉलनी, टाकाळा) यांचे गोकुळ शिरगाव येथे कॅन्सर सेंटर रुग्णालय आहे. याठिकाणी संशयित अजय खोत हा अकाऊंट व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.
त्याने दि. २ जानेवारी २०१५ ते १ एप्रिल २०१६ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करीत औषध खरेदीच्या बोगस बिलांच्या नोंदी करुन संशयित किरण शिंदे व प्रविण आळतेकर यांचेशी संगनमत करुन औषध पुरवठ्याची खोटी बिले सादर करुन त्याप्रमाणे औषधांचा पुरवठा न करताना डॉ. पवार यांच्या रुग्णांलयात १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांची अपहार केला.
याप्रकरणी डॉ. पवार यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेवून तक्रार दिली. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार चौकशीमध्ये अपहार झालेचे स्पष्ट होताच डॉ. पवार यांच्या फिर्यादीवरुन संशयित तिघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. अपहाराची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. शेडे करीत आहेत.