कोल्हापूर : अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी लाक्षणिक उपोषण, संशयिताना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 06:36 PM2018-03-16T18:36:37+5:302018-03-16T18:37:59+5:30

महाराष्ट्र पोलीस दलातील महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर व त्यांच्या सर्व साथीदारांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी शुक्रवारी कोल्हापुरात करण्यात आली.

Kolhapur: In the case of Ashwini Bidre murder, execution of characteristic fasting and suspicion | कोल्हापूर : अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी लाक्षणिक उपोषण, संशयिताना फाशी द्या

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी संशयितांना फाशी व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरात शुक्रवारी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे मिरजकर तिकटी येथे एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे आदींचा सहभाग होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देअश्विनी बिद्रे खूनप्रकरणी लाक्षणिक उपोषणसंशयित अभय कुरुंदकरसह त्याच्या साथीदारांना फाशी द्या बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : महाराष्ट्र पोलीस दलातील महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर व त्यांच्या सर्व साथीदारांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी शुक्रवारी कोल्हापुरात करण्यात आली.

बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीतर्फे मिरजकर तिकटी येथे किसन कल्याणकर व जयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

अभय कुरुंदकर यांना देण्यात आलेले राष्ट्रपती पदक केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाने ताबडतोब परत घ्यावे. अश्विनी बिद्रे खूनप्रकरणातील तीन आमदार कोणत्या पक्षाचे हे जाहीर करून त्यांची चौकशी व्हावी.

कोल्हापूर शहरामध्ये सहकार्य करणाऱ्या पोलिसांची चौकशी होऊन त्यांना बडतर्फ करावे. या खुनाचा तपास जलदगतीने झाला पाहिजे. संपूर्ण कुरुंदकर कुटुंबीयांची व त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी झाली पाहिजे.

बिद्रे खूनप्रकरणी सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची महाराष्ट्र शासनाने खास नियुक्ती करावी. कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी व्यक्तिश: लक्ष घातले पाहिजे, राजकीय दबाव नको, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

उपोषणात माजी नगरसेवक अमोल माने, राजू चव्हाण, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, विकास शिरगांवे, गजानन गरूड, अभिजित मगदूम, कुमार खोराटे, सुमित खानविलकर, गुरूदत्त मारगुड, राहुल चौधरी, नेमिनाथ कागले, सुरेश पोवार आदींचा सहभाग होता.

 

 

Web Title: Kolhapur: In the case of Ashwini Bidre murder, execution of characteristic fasting and suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.