कोल्हापूर :पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळेंना ‘गोकुळ’ कडून व्हीलचेअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:55 AM2018-03-28T11:55:53+5:302018-03-28T11:55:53+5:30

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना ‘गोकुळ’कडून व्हीलचेअर देण्यात आली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Kolhapur: First Hindkesi Shripati Khankhelenna from 'Gokul' wheelchair | कोल्हापूर :पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळेंना ‘गोकुळ’ कडून व्हीलचेअर

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना ‘गोकुळ’च्यावतीने व्हीलचेअर देण्यात आली. यावेळी महादेवराव महाडिक, विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देश्रीपती खंचनाळेंना ‘गोकुळ’ कडून व्हीलचेअरपहिले हिंदकेसरी किताब

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना ‘गोकुळ’कडून व्हीलचेअर देण्यात आली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

खंचनाळे यांनी सन १९५९ मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत हिंदकेसरी किताब पटकाविला. धिप्पाड शरीरयष्टी, रेखीव शरीर असल्याने तो काळ त्यांनी गाजविला होता; पण सध्या शारीरिक व्याधीमुळे खंचनाळे यांना चालणे शक्य होत नाही. त्यासाठी ‘गोकुळ’ने त्यांना व्हीलचेअर देण्याचा निर्णय घेतला.

संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात महादेवराव महाडिक यांच्या हस्ते त्यांना व्हीलचेअर देण्यात आली. यावेळी बोलताना महाडिक म्हणाले, खंचनाळे यांनी हिंदकेसरी किताबासह विविध स्पर्धेत कोल्हापूरचे नाव जगाच्या पाठीवर नेले.

संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक धैर्यशील देसाई, रामराजे कुपेकर, शाहूपुरी तालमीचे मल्ल पवन श्ािंदे, जयवंत चव्हाण, नाना ठोंबरे आदी उपस्थित होते.

 

 

Web Title: Kolhapur: First Hindkesi Shripati Khankhelenna from 'Gokul' wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.