कोल्हापूर : महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:29 AM2018-03-20T11:29:08+5:302018-03-20T11:29:08+5:30
१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबियांसमवेत सामुदायिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिलीच शेतकरी आत्महत्या होती. या आत्महत्या दिनानिमित्त सोमवारी महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर : गेल्या ३३ वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्या आजही थांबलेल्या नाहीत. पूर्वीचे व सध्याचे सरकार शेतकरीभिमुख निर्णय घेऊ शकत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्याय हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी येथे केले. भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून, मागण्या मान्य न झाल्यास हे सरकार उलथवून टाकण्याचा इशाराही नेत्यांनी यावेळी दिला.
१९ मार्च १९८६ ला साहेबराव करपे या शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबियांसमवेत सामुदायिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिलीच शेतकरी आत्महत्या होती. या आत्महत्या दिनानिमित्त सोमवारी महाराष्ट्र शेतकरी संघटना सुकाणू समितीतर्फे राज्यभर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर अन्नत्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात शेतकरी कामगार, जनता दल, अ. भा. किसान सभा, लाल निशान पक्ष, रघुनाथदादा पाटीलप्रणित शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशन, आॅल इंडिया यूथ फेडरेशन, आदी पक्ष, संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी संपतराव पवार-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळून त्यांचे जीवनमान व दर्जा उंचावला पाहीजे. यासाठी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. आजपर्यंत ७५ हजार शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या आहेत. या सर्व आत्महत्या राज्यकर्त्यांच्या धोरणामुळेच झाल्या आहेत. सध्याचे भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी असून, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्याविरोधात विविध पक्ष, शेतकरी संघटना आंदोलन करीत आहेत.
या आंदोलनातून मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रव्यापी आंदोलन आक्रमक करून हे सरकार उलथवून टाकण्याचा इशारा अतुल दिघे, मारुती जाधव (गुरुजी), वसंत पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, नामदेव गावडे, भारत पाटील, ए. डी. अत्तार, सतीशचंद्र कांबळे, गिरीष फोंडे, अॅड. माणिक शिंदे, आदी नेत्यांनी आपल्या भाषणात दिला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना पेन्शन द्या, जमीन अधिग्रहणाची सक्ती थांबवा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
यावेळी विठ्ठलराव खोराटे, बाबासाहेब देवकर, रवी जाधव, बी. एल. बरगे, अॅड. अरुण सोनाळकर, दिनकर सूर्यवंशी, अशोकराव पवार-पाटील, पार्वती तोरस्कर, दीपाली कोळी, नारायण पोवार, गुणाजी शेलार, सुनीता अमृतसागर, सुशांत बोरगे, संजय पाटील, आदी मान्यवर उप