कोल्हापूर : अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामुहीक आत्मदहन करु : राजू जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:33 PM2018-03-07T14:33:55+5:302018-03-07T14:33:55+5:30
शाहूपुरी पाच बंगला भाजी मंडईत विक्रेत्यांना त्रास देणाऱ्या विलास नायडू, लखन नायडू, मिरा सय्यद या तिघांचा येत्या आठ दिवसांत कायमस्वरुपी बंदोबस्त करावा. अन्यथा सर्व भाजीपाला विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) ला सामुहीक आत्मदहन करतील, असा इशारा विक्रेत्यांतर्फे राजू जाधव यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
कोल्हापूर : शाहूपुरी पाच बंगला भाजी मंडईत विक्रेत्यांना त्रास देणाऱ्या विलास नायडू, लखन नायडू, मिरा सय्यद या तिघांचा येत्या आठ दिवसांत कायमस्वरुपी बंदोबस्त करावा. अन्यथा सर्व भाजीपाला विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) ला सामुहीक आत्मदहन करतील, असा इशारा विक्रेत्यांतर्फे राजू जाधव यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
शाहूपुरी पाच बंगला भाजी मंडईमध्ये विलास नायडू याचा व अन्य विक्रेत्यांमध्ये वाद आहे. यातून नायडूने शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर रविवारी (दि. ४) रात्री विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर येथील भाजी विक्रेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
जाधव म्हणाले, गेल्या काही वर्षापासून नायडूसह अन्य दोघेजण येथील भाजी विक्रेत्यांना वारंवार त्रास देत होते. यात माल काढून घेणे, हप्ता मागणे, अॅसिड मारण्याची धमकी देणे ,शिवीगाळ करणे , आदी पद्धतीने दहशत माजवत होते. यावर भाजी विके्रत्यांनी पोलीसांकडे दाद मागून त्यांचा बंदोबस्त केला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याला भाजी मंडईत पुन्हा प्रवेश करायचा असल्याने तो भाजी विक्रेत्यांसह पोलीसांनाही आत्महत्येचा खोटा प्रयत्न करुन वेठीस धरत आहे.
त्यामुळे त्याच्यासह अन्य दोघांचाही पोलीसांनी व जिल्हा प्रशासनाने त्यांचा येत्या आठ दिवसांत कायमचा बंदोबस्त करावा. अन्यथा आम्ही सर्व भाजीपाला विक्रेते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) ला सामुदायिक आत्मदहन करतील, असा इशाराही जाधव यांनी दिला.
या पत्रकार परिषदेस बापू चव्हाण, आण्णा तिळवे, गणेश बुचडे, राजू बागवान, संतोष वाघमारे, किरण पोतदार, अजय चौगुले, किरण खाडे, मोहसीन बागवान, युवराज क्षीरसागर, समाधान बंगाली, जयाबाई शहा, टिपू शेख, संजय सोनवणे, सदाशिव जाधव, रंजना खाडे, योगेश कवाळे, प्रकाश तौर, सुखदेव मैत्री, पारुबाई शहा, लक्ष्मी सुतार, कविता चौगले, वंदना बुचडे, हसिना पसारकर, लक्ष्मी मंगाणे, मनीष क्षीरसागर, पोपट माळी, सुरेश कांबळे, प्रकाश पोवार, तानाजी खंडागळे, कैलास सुर्यवंशी, महेश शहा, श्रीमंत हिरवे, चंदु आलासे, नाजा कांबळे, रमा कांबळे आदी उपस्थित होते.