कोल्हापूर : जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा घाट चकाचक, संवर्धन समितीचा उपक्रम; स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:11 PM2018-03-27T18:11:28+5:302018-03-27T18:11:28+5:30
चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा घाटासह परिसराची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. सुमारे दीड तास स्वयंसेवकांनी घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला.
कोल्हापूर : चैत्र पोर्णिमा जोतिबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पंचगंगा घाटासह परिसराची स्वच्छता मंगळवारी करण्यात आली. सुमारे दीड तास स्वयंसेवकांनी घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला.
शनिवारी (दि. ३१) जोतिबा यात्रा आहे. त्याचे औचित्य साधून व जोतिबा यात्रेकरूंना पंचगंगा नदीमध्ये स्वच्छ व निर्मल पाण्यात स्नान करता यावे यासाठी पंचगंगा घाट स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचे आयोजन राजर्षी शाहू जीवन विकास ट्रस्ट, शाहू मॅरेथॉन व पंचगंगा घाट संवर्धन समिती यांनी केले होते.
यावेळी घाटाचा सर्व परिसर स्वच्छ करून निर्माल्य व घनकचरा गोळा करण्यात आला. सुमारे दोन ट्रॉल्या घनकचरा बाहेर काढण्यात आला. या मोहिमेत बाहेरगावच्या यात्रेकरूंनीसुद्धा सहभाग घेतला होता. यासाठी महापालिकेचे सहकार्य मिळाले. होळकर सामाजिक संस्थेने स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष मोहिमेत सहभाग घेतला.
मोहिमेत शाहू मॅरेथॉनचे अध्यक्ष किसन भोसले, उदय घोरपडे, कार्याध्यक्ष धीरज पाटील, बाळासाो पाटील, संदीप जाधव, शाहू ट्रस्टचे अध्यक्ष किरण मांगुरे, उपाध्यक्ष आनंदराव गुरव, बंडा रावळ, रमेश संकपाळ, अरुण सावंत, ओंकार पाडळकर, गजानन महाडिक, प्रकाश पाटील, शीतल कामत, सुधीर चौगुले, अरविंद ओतारी, सिद्धी कामत, पूजा कामत, राजश्री सुतार, बाळासाो होळकर, हरेश वाधवाणी, विठ्ठल नरवणे यांच्याबरोबर माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता.