कोल्हापूर : प्रवेश परीक्षांसाठी ‘प्रश्न बँक’ तयार, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात २४ केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 05:59 PM2018-05-08T17:59:17+5:302018-05-08T17:59:17+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दि. २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक (क्वेश्चन बँक) तयार करण्यात आली आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी दि. २२ ते २९ मे दरम्यान प्रवेश परीक्षा होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक (क्वेश्चन बँक) तयार करण्यात आली आहे.
विद्यापीठातर्फे दरवर्षी एम. ए., एम. एस्सी जिओग्राफी, एम. ए. मास कम्युनिकेशन, एम. एस्सी. अल्कोहल टेक्नॉलॉजी, बी.जे., एम. जे., एम. एस्सी. शुगर टेक्नॉलॉजी, अॅग्रो केमिकल अॅण्ड पेस्ट मॅनेजमेंट, एम. एस्सी. जिओलॉजी, बी. लिब., एम. लिब., एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध २९ विषयांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी सात अभ्याक्रम वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.
विद्यापीठाच्या परीक्षा विषयक कामकाजात माहिती व तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याच्या उद्देशाने यावर्षीपासून २९ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार दि. २२ ते २९ मे दरम्यान आॅनलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होतील.
फॅक्ल्टी चेंज ही परीक्षा दि. २३ मे रोजी आॅफलाईन पद्धतीने होईल. आॅनलाईन परीक्षज्ञ या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संगणक प्रयोगशाळांमध्ये होणार आहे. परीक्षासाठी कोल्हापूरमध्ये १३, सांगलीत पाच आणि सातारा जिल्ह्यात सहा केंद्रे आहेत.
यावर्षी पहिल्यांदाच सर्व प्रवेश परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यासाठी २२ अभ्यासक्रमांच्या प्रश्न बँक तयार झाल्या आहेत. उर्वरीत अभ्यासक्रमांबाबतची कार्यवाही सुरू आहे. परीक्षा केंद्रांसह तेथील समन्वयकांची निश्चिती झाली आहे. काही अडचण निर्माण झाल्यास त्यावर पर्याय म्हणून ओएमआर शीटस्ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
-महेश काकडे,
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- प्रवेश परीक्षा होणारे अभ्यासक्रम : २९
- एकूण परीक्षा केंद्रे : २४