Milk Supply कोल्हापूर जिल्ह्यात दुध आंदोलन तीव्र, संघटना आक्रमक, कार्यकर्त्यांला दुधाने अंघोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:24 PM2018-07-17T14:24:03+5:302018-07-17T14:39:13+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले आहेत.
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूधाचें सात ट्रॅकर फोडले, तर शिरढोणमध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा दुधाने अंघोळ घालुन आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रति लीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनात प. महाराष्ट्रासह राज्यात शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने, लाखो लीटर दुधाचे संकलन झाले नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात शेतक-यांनी दूधच न घातल्याने दूध संकलन जवळजवळ ठप्प झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील दुधाचे टँकर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले.
उदगावमध्ये दूधाचें सात ट्रॅकर फोडले
कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास वारणेचे सात दूध वाहतूक करणारे ट्रॅकर फोडल्याने मध्यरात्री पासून उदगाव मध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे उदगावात सॅटेलाईट दूध डेअरीत दुधाचे टँकर पोलीस बंदोबस्तात रवाना झाले.
उदगावमध्ये पोलीस फौज फाट्यासह बदोबस्त असून उदगाव मधील तीन दूध संघ पोलिसांनी व्यापला आहे. शिरढोणमध्येही कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांला दुधाने अंघोळ घालुन आंदोलन करण्यात आले.