कोल्हापूर : तूरडाळ उद्यापासून रेशन दुकानांमधून विक्री : जिल्ह्यासाठी २ हजार ९०० क्विंटल तूरडाळ उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:52 AM2018-05-15T11:52:44+5:302018-05-15T11:52:44+5:30
कोल्हापूर जिल्ह्यासाठी मे महिन्यातील २ हजार ९०० क्विंटल तूरडाळ जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून चलनाद्वारे रेशन दुकानदारांकडून तूरडाळीचे पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पैसे भरून घेतल्यानंतर दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे आज, मंगळवारी डाळ पोहोच केली जाणार आहे. यानंतर दुकानांमधून उद्या, बुधवारपासून ग्राहकांना तूरडाळ विक्री होणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यासाठी मे महिन्यातील २ हजार ९०० क्विंटल तूरडाळ जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून चलनाद्वारे रेशन दुकानदारांकडून तूरडाळीचे पैसे भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पैसे भरून घेतल्यानंतर दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे आज, मंगळवारी डाळ पोहोच केली जाणार आहे. यानंतर दुकानांमधून उद्या, बुधवारपासून ग्राहकांना तूरडाळ विक्री होणार आहे.
जिल्ह्यातील १५७२ रेशन दुकानांमधून साडेपाच लाख अन्न सुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांना या तूरडाळीची विक्री सुरू होणार आहे. ही तूरडाळ रेशनवर ५५ रुपये किलोने कार्डधारकाला विक्री केली जाणार आहे.
रेशन दुकानदारांकडून डाळ खरेदीसाठीचे पैसे चलनाद्वारे भरून घेण्याचे काम सुरू असून ते आज, मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर संबंधित दुकानदारांना द्वारपोच योजनेद्वारे डाळ पोहोच केली जाईल.
त्यानंतर उद्या, बुधवारपासून सर्व रेशन दुकानांमधून या डाळीची विक्री सुरू होईल. त्या दृष्टीने जिल्हा पुरवठा विभागाकडून नियोजन सुरू आहे.