कोल्हापुरात सामाजिक जाणिवेची वीण घट्ट; ४४ हजार मूर्ती, १०० टन निर्माल्य दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:30 AM2018-09-19T00:30:35+5:302018-09-19T00:30:38+5:30

Kolhapur social networking is tight; 44 thousand idols, 100 tons worthless donation | कोल्हापुरात सामाजिक जाणिवेची वीण घट्ट; ४४ हजार मूर्ती, १०० टन निर्माल्य दान

कोल्हापुरात सामाजिक जाणिवेची वीण घट्ट; ४४ हजार मूर्ती, १०० टन निर्माल्य दान

Next

कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची साद घालत सोमवारी (दि. १७) गणेश विसर्जनावेळी शहर परिसरात ४४ हजार २२६ विसर्जित गणेशमूर्ती तसेच सुमारे १०० टनांहून अधिक निर्माल्य महानगरपालिकेच्या स्वाधीन करून शहरवासीयांनी सामाजिक जाणिवेची वीण घट्ट केली. शहरातील पंचगंगा नदी तसेच महत्त्वाचे तलाव यांचे संवर्धन करण्यात शहरवासीयांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, महापालिका कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी विसर्जनस्थळांचा परिसर स्वच्छ केला.
महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी नागरिकांना गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पंचगंगा नदी, तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने तात्पुरते गणेश विसर्जन कुंड, मूर्ती जमा करण्यासाठी स्टेज, काहिली व निर्माल्य कुंडांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.
गणेशमूर्ती, निर्माल्य व पूजासाहित्य विसर्जन करण्यासाठी इराणी खण, तांबट कमान येथील कुंड, मोहिते खण, गंजीवली खण, रामानंदनगर चौपाटी, संध्यामठ, राजे संभाजीनगर तरुण मंडळ, पदपथ उद्यान, पतौडी खण, सरदार तालीम, संभाजीनगर, साळोखेनगर, तलाव परिसर, पंचगंगा नदीघाट परिसर, प्रायव्हेट हायस्कूल पटांगण, स्वामी समर्थ मंदिर, नारायणदास मठ, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, सायबर चौक व राजाराम गार्डन, राजाराम बंधारा- कसबा बावडा, नर्सरी उद्यान- रुईकर कॉलनी, बापट कॅम्प- नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन, इ. ठिकाणी कृत्रिम कुंड, काहिली, निर्माल्यकुंड, आदींची व्यवस्था केली होती. या ठिकाणी नागरिकांनी गणेशमूर्ती व निर्माल्याचे विसर्जन करून महापालिकेच्या या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला.
शहरवासीयांनी दान केलेल्या गणेशमूर्ती एकत्र करून सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून नेऊन इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. सोमवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. नागरिकांनी दान केलेले १०० टन निर्माल्य गोळा करण्यात आले. हे निर्माल्य वाशी येथे खत तयार करण्यासाठी ‘एकटी’ संस्थेस महापालिकेच्या वतीने पोहोच केले.
विसर्जनस्थळांची स्वच्छता
मंगळवारी सकाळी महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने विसर्जनस्थळ परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली. सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वी सर्व परिसर चकाचक झाले होते. त्याची छायाचित्रे महानगरपालिकेने आयुक्तांना अधिकाऱ्यांच्या अ‍ॅपवर अपलोड केली आणि मगच नेहमीच्या प्रभागातील कचरा उठावाचे काम सुरू झाले. सुमारे ३00 हून अधिक स्वच्छता कर्मचारी, तसेच काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही यात योगदान दिले.

Web Title: Kolhapur social networking is tight; 44 thousand idols, 100 tons worthless donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.