कोल्हापूर : साखर कारखाने आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावेत : हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:29 PM2018-08-04T15:29:46+5:302018-08-04T15:36:12+5:30
आगामी हंगामात राज्यात ११.६८ लाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र असल्याने किमान १२२ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे गरजेचे असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : आगामी हंगामात राज्यात ११.६८ लाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र असल्याने किमान १२२ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणे गरजेचे असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
साखर उद्योगासमोर अडचणी पाहता सरकारने साखरेचा किमान दर २९०० वरून ३५०० रूपये करणे, निर्यात अनुदानात वाढ आणि इथेनॉलबाबतचे धोरणात बदल या सगळ्या गोष्टींचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केला तरच साखर उद्योग तरेल, असेही पाटील यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.