कोल्हापूर : हिंदु युवा प्रतिष्ठानचे प्रतिकात्मक आंदोलन, ‘आडवे पडू पुरस्कार ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 03:03 PM2018-05-24T15:03:50+5:302018-05-24T15:03:50+5:30

सध्या शहरात ‘आडवे पडू ’ नावाची एक जमात सगळच समजतं ‘स्वत:ला सगळ समजत ’ या अशा आर्विभावात प्रत्येक विकास कामात आडवे पडतात. अशांना हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिकात्मक ‘आडवे पडू पुरस्कार’ दिला जाणार आहे. ही बक्षिसाची ढाल करवीरकरांना पाहण्यासाठी गुरुवारी शिवाजी चौकात खुली करण्यात आली.

Kolhapur: The symbolic movement of Hindu Yuva Pratishthan, 'Adve Padu Award' | कोल्हापूर : हिंदु युवा प्रतिष्ठानचे प्रतिकात्मक आंदोलन, ‘आडवे पडू पुरस्कार ’

कोल्हापूर : हिंदु युवा प्रतिष्ठानचे प्रतिकात्मक आंदोलन, ‘आडवे पडू पुरस्कार ’

Next
ठळक मुद्देहिंदु युवा प्रतिष्ठानचे प्रतिकात्मक आंदोलन‘आडवे पडू पुरस्कार ’ चिन्हाचे शिवाजी चौकात अनावरण

कोल्हापूर : सध्या शहरात ‘आडवे पडू ’ नावाची एक जमात सगळच समजतं ‘स्वत:ला सगळ समजत ’ या अशा आर्विभावात प्रत्येक विकास कामात आडवे पडतात. अशांना हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिकात्मक ‘आडवे पडू पुरस्कार’ दिला जाणार आहे. ही बक्षिसाची ढाल करवीरकरांना पाहण्यासाठी गुरुवारी शिवाजी चौकात खुली करण्यात आली.

कोल्हापूर शहरातील ठराविक मंडळी सगळ्या विषयातले सगळे समजते, असे म्हणून पुढे येवून सुुरळीत सुरु असलेले काम बंद पाडण्याचा प्रयत्न करतात. यात चांगली योजना, प्रकल्प, विकासात्मक संधी कोल्हापूरात येणार म्हटले की माहीती अधिकार, स्थगिती याचिका आदी माध्यमे वापरून विकासाला खो घालण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा आडवे पडणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार दिला जाणार आहे. या बक्षिस रुपी ढालीचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. यासह अशा प्रवृत्ती विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महादेव कुकडे, अ‍ॅड. संपतराव पोवार, महेश इंगवले, राजन सुर्यवंशी, प्रफुल्ल माळकर, महादेव लोहार, सुशील भांदिगरे, सुरेश जरग, विजय आगरवाल, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, सयाजी आळवेकर, गणेश देसाई, नजीर देसाई, आदी उपस्थित होते.

कोल्हापूरातील शिवाजी चौक येथे हिंदु युवा प्रतिष्ठानतर्फे शहराच्या विकास कामात आडवे पडणाऱ्या व्यक्तींसाठी प्रतिकात्मक ‘आडवे पडू पुरस्कार’ढालीचे अनावरण गुरुवारी झाले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)

 

Web Title: Kolhapur: The symbolic movement of Hindu Yuva Pratishthan, 'Adve Padu Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.