कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 05:51 PM2018-07-11T17:51:22+5:302018-07-11T17:58:36+5:30

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिला.

Kolhapur: Take action against Panchganga Pollution Question 15 August: Departmental Commissioner | कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्त

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्त

Next
ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषणप्रश्नी १५ आॅगस्टपूर्वी उपाययोजना करा : विभागीय आयुक्तबैठकीत महापालिका, इचलकरंजी नगरपालिकेला सूचना

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने आवश्यक त्या उपाययोजना दि. १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करून त्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण महामंडळास सादर करावा, त्यानंतर कोणत्याही सबबी चालणार नसल्याचा इशारा विभागीय आयुक्तदीपक म्हैसेकर यांनी दिला.

प्रदुषणमुक्तीसाठी प्रदुषणमुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सुचना देत इचलकरंजीतील ६७ पैकी प्रदूषणास कारणीभूत असणारे ३६ कारखाने बंद करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गेल्याच आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर महापालिका आयुक्त व इचलकरंजीच्या मुख्याधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष, विभागीय आयुक्तदीपक म्हैसेकर हे प्रथमच बुधवारी कोल्हापुरात आले.

त्यांनी सकाळी दुधाळी येथील एसटीपी प्लँट, जयंती नाल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीस, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे आयुक्त कुणाल खेमनार, महापालिका आयुक्तडॉ. अभिजित चौधरी, उपजिल्हाधिकारी मुकेश काकडे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहाळकर, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदीजण उपस्थित होते.

पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील औद्योगिक घटक व कारखान्यांचे पाणी नदीत सोडले जाते, याबाबतचा सविस्तर सर्व्हे येत्या १५ आॅगस्टपर्यंत एमआयडीसीने पूर्ण करावा, अशी सूचना करून विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पंचगंगा नदीत लघु तसेच मध्यम उद्योग घटकाकडून सोडले जाणारे पाणी तसेच इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यात येणारे पाणी याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व कार्यवाही करावी.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी

जिल्ह्यातील साखर कारखाने, डिस्टिलरी, एमआयडीसी, पॉवर लूम याबाबत किती कारखाने प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळत नाहीत, अथवा त्या कारखान्यांनी प्रदूषण नियंत्रण केले आहे का? याची माहिती मागविली; पण अशी माहिती उपलब्ध नसल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सांगितले, तर उद्योगांचे प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत मिसळत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधून एमआयडीसीच्या अधिकाºयांची कानउघाडणी केली.

इचलकरंजीतील ३६ कारखाने बंद करा

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी इचकरंजीतील ६७ पॉवरलूम कारखान्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यापैकी ३६ कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी माहिती दिली, तर असे कारखाने त्वरित बंद करण्याचे आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

Web Title: Kolhapur: Take action against Panchganga Pollution Question 15 August: Departmental Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.