कोल्हापूर : दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचीही कोंडी करणार, मालवाहतूक संघटनांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 05:56 PM2018-07-23T17:56:25+5:302018-07-23T18:03:21+5:30

वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी बैठकीत केले.

Kolhapur: In two days, there will be a ban on essential commodities, cargo organizations warn | कोल्हापूर : दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचीही कोंडी करणार, मालवाहतूक संघटनांचा इशारा

कोल्हापूर : दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचीही कोंडी करणार, मालवाहतूक संघटनांचा इशारा

Next
ठळक मुद्देदोन दिवसांत जीवनावश्यक वस्तूंचीही कोंडी करणार, मालवाहतूक संघटनांचा इशारा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; कृत्रिम टंचाई होणार नसल्याची दक्षता

कोल्हापूर : वाहतूक संघटनांकडून पुकारलेल्या बंदच्या परिस्थितीत भाजीपाला, दूध, औषधे यांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा जनतेला प्राधान्याने पुरवठा व्हावा, यामध्ये कसल्याही प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी बैठकीत केले.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत शासनाने मागण्या मान्य न केल्यास जीवनावश्यक वस्तूंचीही वाहतूक बंद ठेवून कोंडी करणार असल्याचा इशारा वाहतूक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिला.

राज्यातील विविध वाहतूक संघटनांनी २० जुलैपासून संप पुकारला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात झाली.

बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एम. टी. अल्वारीस, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अजित पाटील, पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी, पेट्रोलपंप व एलपीजी गॅस संघटनांचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी, नगररचना विभागाचे उपसंचालक धनंजय खोत, पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, अन्न व औषध प्रशासनाच्या साहाय्यक आयुक्त एम. एस.ज्वंजाळ- पाटील, एस. ए. चौगुले, बाजार समितीचे सहसचिव जयवंत पाटील, अन्नधान्य वितरण अधिकारी संजय वळवी, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, किराणा भुसार धान्य असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर तांदळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाहतूकदारांच्या संपामुळे जिल्ह्यात अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा, गॅस, पेट्रोल, डिझेल, आदींच्या पुरवठ्याबाबत आणि उपलब्धतेबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

सक्ती केल्यास वाहने ‘नॉन यूज’ साठी अर्ज करणार

वाहतूकदारांच्या संप कालावधीत दूध, भाजीपाला, औषधे, गॅस, पेट्रोल, डिझेल, रॉकेल, आदी जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा व्हावा, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यानी जीवनावश्यक वस्तंूसह रेशन धान्याची वाहतूकही सुरळीतपणे चालू राहावी, यासाठी ‘आरटीओ’ मार्फत काही खासगी मालट्रक ताब्यात घेऊन धान्याचा पुरवठा करावा लागेल; पण त्यास वाहतूक संघटनांनी विरोध दर्शवत, अशा पद्धतीने वाहने ताब्यात घेण्याची सक्ती केल्यास आम्ही सामूहिक पद्धतीने ‘नॉन यूज’ साठी (सहा महिने वाहन वापरणार नाही) आरटीओ कार्यालयाकडे अर्ज करणार असल्याचा इशारा दिला.

चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत

वाहतूकदारांच्या संपकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याचीही दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुभेदार यांनी करून, संपाबाबतची माहिती देण्यासाठी व संपाबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत असल्याचेही सांगितले.
 

 

Web Title: Kolhapur: In two days, there will be a ban on essential commodities, cargo organizations warn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.