कोल्हापूर : राजारामपुरीतील हद्दपार केलेल्या दोन गुंडांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:39 PM2018-08-03T12:39:32+5:302018-08-03T12:43:12+5:30

पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या दोन हद्दपार केलेल्या गुंडांना राजारामपुरी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. १) रात्री पकडले.

Kolhapur: Two kidnappers detained in Rajarampurpuri arrested | कोल्हापूर : राजारामपुरीतील हद्दपार केलेल्या दोन गुंडांना अटक

कोल्हापूर : राजारामपुरीतील हद्दपार केलेल्या दोन गुंडांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देराजारामपुरीतील हद्दपार केलेल्या दोन गुंडांना अटकस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : पोलीस दप्तरी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या दोन हद्दपार केलेल्या गुंडांना राजारामपुरी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. १) रात्री पकडले.


आसू बादशहा शेख (वय २३) व रोहित ऊर्फ सोन्या परशुराम कुऱ्हाडे (२०, दोघे रा. राजारामपुरी १४ वी गल्ली, कोल्हापूर) असे अटक केलेल्यांचे नाव आहे. या दोघांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते.



संशयित आसू शेख व रोहित कुऱ्हाडे या दोघांना करवीर प्रांताधिकारी यांनी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हद्दपार करूनही ते शहरात वावरत होते. त्यांनी प्रांताधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला होता. दरम्यान, गोखले कॉलेज व माउलीचा पुतळा, राजारामपुरी या रस्त्यावर शेख व कुऱ्हाडे या दोघांना बुधवारी पकडले. त्यांच्यावर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, उपनिरीक्षक सचिन पंडित, युवराज आठरे, राजेंद्र सानप यांच्यासह हेड काँन्स्टेबल इकबाल महात, शिवाजी खोराटे, श्रीकांत मोहिते, सुनील कवळेकर, सुनील इंगवले, उत्तम सडोलीकर, रमेश डोईफोडे, प्रकाश संकपाळ, सुकुमार हासुरकर, यशवंत उपराटे, अनिल पास्ते, अजय काळे, जनार्दन खाडे, आनंद निगडे, सुरेश गुरव यांनी केली.

 

 

Web Title: Kolhapur: Two kidnappers detained in Rajarampurpuri arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.