कुणाल खेमनार जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ

By admin | Published: April 28, 2016 11:15 PM2016-04-28T23:15:10+5:302016-04-29T00:55:02+5:30

सोमवारी रुजू : अविनाश सुभेदार यांची बदली

Kunal Khemmanar Zilla Parishad's new CEO | कुणाल खेमनार जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ

कुणाल खेमनार जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ

Next

कोेल्हापूर : येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांची विनंती बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी व सहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांची नियुक्ती झाली आहे. खेमनार २ मे रोजी सूत्रे स्वीकारतील. सुभेदार यांना अद्याप नियुक्तीचे पद मिळालेले नाही.
सीईओ म्हणून सुभेदार ७ आॅगस्ट २०१४ रोजी हजर झाले. त्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षक संघटनांचा प्रशासनातील हस्तक्षेप मोडून काढला. सातवे (ता. पन्हाळा), जांभूळवाडी (गडहिंग्लज) आदी गावांतील पेयजल योजनेत गैरव्यवहार केलेल्यांवर दबाव झुगारून कारवाई केली. गेल्या महिन्यात त्यांना केंद्र शासनाकडून आयएएसचा दर्जा मिळाला.
नूतन सीईओ म्हणून खेमनार यांची नियुक्ती शासनाने केली आहे. खेमनार यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी व गडहिंग्लजचे प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारीपदी त्यांची पहिली नियुक्ती झाली. त्यांनी ५ सप्टेंबर २०१४ रोजी सूत्रे हाती घेतली. प्रांत कार्यालयातील जागा महसूल विभागाच्या नावे करणे, इंचनाळ देवस्थानच्या जमिनीसंबंधीचा निर्णय, एव्हीएच्या विरोधातील जनआंदोलन, विधानसभा निवडणूक यामध्ये खेमनार यांनी महत्त्वपूर्ण अशी प्रभावी कामगिरी केली. (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद सीईओ म्हणून बदलीचा आदेश शासनाकडून मिळाला आहे. २ मे रोजी सीईओ पदाची सूत्रे स्वीकारेन.
- कुणाल खेमनार

कौटुंंबिक सोयीसाठी शासनाकडे केलेल्या विनंतीनुसार बदली झाली आहे; पण अजून नवे पद शासनाकडून मिळालेले नाही.
-अविनाश सुभेदार, सीईओ


‘गडहिंग्लज’च्या प्रांताधिकारी चौगले
चार महिन्यांपूर्वीच खेमनार यांचा प्रशिक्षणार्थी कालावधी संपला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता चौगले यांची बदली गडहिंग्लजचे प्रांताधिकारी म्हणून झाली. परंतु, खेमनार यांच्या बदली पदाच्या नियुक्तीचा आदेश नव्हता. त्यामुळे ते प्रांताधिकारी म्हणूनच कार्यरत राहिले. खेमनार यांची सीईओपदी नियुक्ती झाल्यामुळे रिक्त झालेल्या प्रांताधिकारी पदावर चौगले रुजू होतील.
खेमनार औरंगाबादचे...
खेमनार यांचे मूळ गाव औरंगाबाद आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस पूर्ण केले. वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. आई शिक्षिका आहे. ते २०१२ बॅचचे आयएएस आहेत.

Web Title: Kunal Khemmanar Zilla Parishad's new CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.