आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक
By admin | Published: May 15, 2017 01:01 AM2017-05-15T01:01:08+5:302017-05-15T01:01:22+5:30
५६ वा वार्षिक सोहळा : विविध रंगातील मूर्तीच्या छटा पाहून श्रावक-श्राविका सुखावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठातील श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी मूर्तीवर रविवारी धार्मिक सोहळ्यात महामस्तकाभिषेक करण्यात आला. ५६ व्या वार्षिक महामस्तकाभिषेकासाठी मुंबई, बेळगांवसह विविध ठिकाणांहून आलेल्या जैन श्रावक-श्राविकांनी गर्दी केली होती. संहितासुरी, भट्टारक शिरोमणी प. पूज्य डॉ.
स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी
यांच्या अधिपत्याखाली व कर्नाटक येथील जगद्गुरू स्वस्तिश्री प. पूज्य डॉ. देवेंद्रकीर्ती भट्टारक महास्वामी यांच्या उपस्थितीत
सायंकाळी महामस्तकाभिषेक करण्यात आला.
यावेळी दुग्धाभिषेक, इक्षूराभिषेक, चंदनचूर्ण, कुंकुमाभिषेक, हळदाभिषेक, अष्टगंध, पुष्पावृष्टी आदी महामस्ताभिषेक विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. राजू उपाध्ये, प्रशांत उपाध्ये, शशिकांत उपाध्ये, पद्माकर
उपाध्ये यांच्या उपस्थित पूजाविधी संपन्न झाला. यावेळी धन्यकुमार जैन, अजित सांगावे, पद्माकर
कापसे, धनंजय मगदूम, अशोक रोटे, नेमीनाथ कापसे, डॉ. धनंजय
गुंडे, रावसाहेब देशपांडे यांच्यासह
जैन श्रावक व श्राविका उपस्थित
होते.
दरम्यान, सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष व ध्वजारोहण करण्यात आले. भगवान
चंद्रप्रभ तीर्थकरांचा पंचामृत अभिषेक व महाशांती मंत्र पठण करण्यात
आले. दुपारी तीन वाजता डॉ. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक
पट्टाचार्य महास्वामीजींचे मंगल प्रवचनाचा कार्यक्रम पार
पडला.
चतुष्कोण (चार दिशेला) अभिषेकाचे मानकरी -
शशिकांत दोशी व माणिकचंद दोशी (पंढरपूर), अशोक चौगुले (सांगली), डॉ. रवींद्र दोशी (फलटण).
पाटील दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित
श्री लक्ष्मीसेन मठाच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श दाम्पत्य-२०१७’ या पुरस्काराने जयसिंगपूर येथील प्रा. डी. ए. पाटील व विमल डी. पाटील यांना गौरविण्यात आले.
महामस्तकाभिषेकाचे मानकरी-दुग्धाभिषेक - हर्षद शहा
इक्षूराभिषेक - शांतीनाथ कांते, सुरेखा पाटील, विवेक शेटे (मिरज)
कलकचूर्ण - जयप्रकाश पाटील (हालोंडी)
कुंकूमाभिषेक - चंद्रकांत बंडू शेट्टी
(सांगली), माधव उपाध्ये
कसबद्रव्य - माधव उपाध्ये (कोल्हापूर)
हळदाभिषेक - नीळकांत जैन
सर्वोषधी - मधुकर मगदूम (मुंबई), नीळकांत जैन
अष्टगंध - संतोष मेहता
पुष्पावृष्टी - शांतीनाथ शेट्टी (रायबाग)
शांतीकोश - महावीर टोणे (पुणे)
शांतीकलश व मंगल आरती - अजित कोळेकर