शिवीगाळ केल्याच्या रागातून परप्रांतीय कामगाराचा खून, शाहूवाडी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 02:07 PM2022-03-26T14:07:44+5:302022-03-26T14:14:13+5:30
शाहूवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे किरकोळ वादातून परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. अक्षय गावकर (वय ...
शाहूवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे किरकोळ वादातून परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची घटना घडली. अक्षय गावकर (वय २९, रा. रामनगर, ता. जोयडा, जि. कारवार, कर्नाटक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी सहदेव थाणु यादव (मु. कोटवारटिह, पो. चंदवारा, ता. चंदवारा, जि. कोडरमा, झारखंड) याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अश्लिल शिवीगाळ केल्याच्या रागातून अक्षयच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून ठार मारल्याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. काल, शुक्रवारी (दि.२५) रात्री उशिरा ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथील म्हसोबा मंदिराजवळ बाॅक्साईट डेपो आहे. या बाॅक्साईट डेपोवर मृत अक्षय गावकर हा भुमी रिसोर्जेस प्रायव्हेट लि. या कंपनीकडे भाडेतत्वार असलेल्या मशिनरीवर व्हिल लोडरवर काम करत होता. तर आरोपी सहदेव यादव हा पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करतो. काल, शुक्रवारी रात्री मृत अक्षय व सहदेव यांच्यात वादावादी झाली. यावेळी अक्षयने सहदेवला अश्लील शिवीगाळ केली.
हा राग मनात धरून सहदेवने अक्षयवर लोखंडी पाईपने वार केला. यात अक्षयला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत झाला. याबाबत कंपनीचे सुफर वायझर बसवराज कल्लाप्पा पाटील (रा. शाहूवाडी) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मृत अक्षय गावकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रूग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.