भूसंपादनाचा तिढा सुटेना नागपूर-रत्नागिरी महामार्ग : दीड वर्षात कोल्हापुरात गुंठाभरही जमिनीचा ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:58 AM2018-10-13T00:58:14+5:302018-10-13T00:58:40+5:30

विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र-कोकण यांना जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या प्रस्तावित महामार्गासाठी भूसंपादनाची नोटीस निघून दीड वर्ष उलटले तरी अजून गुंठाभरही जमिनीचे संपादन झालेले नाही. या महामार्गावरील कोल्हापूर ते रत्नागिरी या टप्प्यात ४९ गावांतील

 Nagpur-Ratnagiri Highway: Three-storied shoot-out of land acquisition in Kolhapur | भूसंपादनाचा तिढा सुटेना नागपूर-रत्नागिरी महामार्ग : दीड वर्षात कोल्हापुरात गुंठाभरही जमिनीचा ताबा नाही

भूसंपादनाचा तिढा सुटेना नागपूर-रत्नागिरी महामार्ग : दीड वर्षात कोल्हापुरात गुंठाभरही जमिनीचा ताबा नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे भूसंपादनाचा तिढा सुटेना नागपूर-रत्नागिरी महामार्ग : दीड वर्षात कोल्हापुरात गुंठाभरही जमिनीचा ताबा नाही

नसीम सनदी।
कोल्हापूर : विदर्भ-पश्चिम महाराष्ट्र-कोकण यांना जोडणाऱ्या नागपूर ते रत्नागिरी या प्रस्तावित महामार्गासाठी भूसंपादनाची नोटीस निघून दीड वर्ष उलटले तरी अजून गुंठाभरही जमिनीचे संपादन झालेले नाही. या महामार्गावरीलकोल्हापूर ते रत्नागिरी या टप्प्यात ४९ गावांतील जमिनी संपादित होणार आहेत. यात सर्वाधिक २४ गावे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. पन्हाळ्यातील ११, करवीरमधील आठ आणि हातकणंगले तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे. या गावांनी आधीच रस्त्यासाठी जमिनी दिल्या आहेत. आता परत एकदा जमिनी द्याव्या लागणार असल्याने त्यांच्यात असंतोष आहे.

रस्त्यालगतच्या गावातील जमिनीचे क्षेत्र लहान असले तरी त्या पिकाऊ असून त्यावरच शेतकºयांचा उदरनिर्वाह चालत आहे. रस्ता होण्याला शेतकºयांचा विरोध नाही; पण पिकणाºया अतिरिक्त जमिनी संपादनाला आणि त्यातून मिळणाºया तोकड्या मोबदल्याला त्यांचा विरोध आहे. कमीत कमी पिकाऊ जमीन जाईल, अशा भागातून रस्ता न्यावा, अशी शेतकºयांची भूमिका आहे.

नागपूर ते रत्नागिरी या ११८७ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने १५०० कोटींची आर्थिक तरतूदही केली. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना एप्रिल २०१७ मध्ये दिल्या; पण तेव्हापासून आजतागायत भूसंपादनाची प्रक्रियाच पुढे सरकू शकलेली नसल्याने या महामार्गाचे भवितव्य अधांतरी आहे. विशेषत: कोल्हापुरात १४७ किलोमीटरच्या मार्गासाठी भूसंपादनास टोकाचा विरोध होऊ लागल्याने कोल्हापूरच्या पुढे हा मार्ग सरकण्याविषयी आता साशंकता व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत हा महामार्ग करण्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी घोषित केले होते. रत्नागिरी, टिंक, पाली, कोल्हापूर, सांगोला, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, बुटीबोरी, नागपूर एमआयडीसी असा ११८७ किलोमीटरचा हा चौपदरी महामार्ग असणार आहे.

हा महामार्ग कोल्हापुरातून जात असल्याने शहराऐवजी शहराच्या बाहेरून काढण्यासाठी त्याची दोन टप्प्यांत विभागणी केली आहे. कोल्हापूर ते सांगली आणि कोल्हापूर ते रत्नागिरी अशी ती विभागणी आहे. कोल्हापूर ते सांगली हा ५२ किलोमीटरचा मार्ग आधीच खासगीकरणातून चौपदरी केला आहे. तो राज्य मार्गाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून घेतला आहे.

असा असेल कोल्हापूर-रत्नागिरी प्रस्तावित मार्ग
कोल्हापूरहून रत्नागिरीला जाणारा सध्याचा रस्ता हा शहरातून जात असल्याने त्याऐवजी तो शियेमार्गे करण्यासाठी चोकाक ते शिये या मार्गावर नवीन रस्ता होणार आहे. त्यानंतर शिये ते केर्लेमार्गे हा रस्ता वाघबीळ, पन्हाळा रस्त्याला जाऊन मिळणार आहे. रत्नागिरीला जोडताना आंबा घाटात चार बोगदे प्रस्तावित आहेत. एक किलोमीटरचे दोन, पावणेदोन किलोमीटरचा एक आणि साडेतीन किलोमीटरचा एक असे चार बोगदे असणार आहेत. याशिवाय मार्गावरील प्रत्येक नदी, ओढ्यावर नवीन पूल होणार आहेत. १४ मीटर रुंदीच्या या मार्गावर सात-सात मीटरचे दोन रस्ते प्रस्तावित आहेत.

४९ गावांतील जमिनीचे होणार संपादन
कोल्हापूर ते रत्नागिरी हा रस्ता जिल्ह्यातील ४९ गावांतून जाणार आहे. या गावांतील बहुतांश जमीन पिकाऊ व सुपीक आहे. किती हेक्टर जमीन या भूसंपादनासाठी बाधित होईल, याबाबत अजून सर्वेक्षण झालेले नसल्याने निश्चित आकडा सध्या सांगता येत नसल्याचे भूसंपादन अधिकाºयांचे म्हणणे आहे


१५०० कोटी परत जाण्याची भीती
कोल्हापुरातून भूसंपादनाला टोकाचा विरोध होत असल्याने नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग कोल्हापूरच्या पुढे सरकण्याविषयी खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळेच नागपूर ते रत्नागिरी या मार्गासाठी तरतूद केलेले १५०० कोटी रुपये आठ ते दहा दिवसांत परत जातील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

भूसंपादन होणारी प्रस्तावित ४९ गावे
शाहूवाडी तालुका : २४
आंबा, तळवडे, केर्ले, चांदोली, वारूळ, वालूर, निले, करुंगळे, येल्लूर, जाधववाडी, पेरिड, कोपार्डे, चंदवड, ससेगाव, करंजोशी, बहिरेवाडी, सावे, गोगवे, बांबवडे, ठमकेवाडी, वाडीचरण, चरण, डोणोली, खुटाळवाडी.
पन्हाळा तालुका : ११
आवळी, पिंजारवाडी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, आंबवडे, पिंपळे, सातवे, दाणेवाडी, कुशिरे.
करवीर : ८
केर्ले, पडवळवाडी, केर्ली, निगवे दुमाला, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये.
हातकणंगले : ६
नागाव, टोप, वडगाव, हेरले, माले, चोकाक

सुपीक शेती व भरपाईचे कमी दर हे विरोधाचे प्रमुख कारण
बांबवडेतून बायपास जाणाºया रस्त्याला स्थानिकांचा विरोध आहे. त्यावर अनेक वेळा सुनावणीही झाली आहे. हेरलेतून निगवे फाटा या बायपास रस्त्याला आमदार चंद्रदीप नरके यांनी टोकाचा विरोध केला आहे.
या भागातील सर्व जमिनी सुपीक, बागायती असल्याने शेतकºयांनी जोरदार हरकती घेतल्या आहेत. या बायपासऐवजी वाठार ते बोरपाडळे हा मार्ग रुंंदीकरण करून रत्नागिरीला जोडण्यासाठी सुचविला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला नसल्याचे समजते. याच रस्त्याचा तिसरा बायपास असलेल्या निळे ते मलकापूर या रस्त्याला विरोध आहे.पन्हाळा व शाहूवाडी हे तालुके दुर्गम असल्याने रेडीरेकनरचे दरही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे मिळणारी भरपाई अगदीच तुटपुंजी आहे, हेही या विरोधामागचे एक कारण आहे.

Web Title:  Nagpur-Ratnagiri Highway: Three-storied shoot-out of land acquisition in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.