१ मार्चपासून असहकार आंदोलन फसवी कर्जमाफी : शेतकरी सुकाणू समितीत निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 01:25 AM2018-02-17T01:25:51+5:302018-02-17T01:27:25+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीत आतापर्यंत केवळ १० ते १५ टक्के शेतकºयांना लाभ झाला असून, ही कर्जमाफी पूर्णत: फसवी आहे. या विरोधात संपूर्ण राज्यात रान उठविणार असून, त्याची सुरुवात १ मार्चपासून असहकार आंदोलनाने करण्याचा निर्धार शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आला.
जिल्हा शेतकरी सुकाणू समितीची बैठक शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार होते. शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, कर्जमाफी म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखा प्रकार आहे. सरकार व मंत्री हजारो कोटींच्या कर्जमाफीची भाषा करीत सुटले आहेत; पण शेतकºयांच्या हातात अद्याप दमडीही पडलेली नाही.
सरकारने पाठविलेल्या हिरव्या यादीतील शेतकºयांची नावे पाहिली तर यामध्ये धनदांडगे, कर्जबुडव्यांचा भरणा अधिक असून त्यामुळे प्रामाणिकपणे परतफेड करणारे शेतकरी हडबडले आहेत. यावरून कर्जमाफीचे धोरण फसवे आहे, हेच सिद्ध होते. असहकार आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला शुद्धीवर आणावे लागणार आहे. आंदोलनाची सुरुवात इस्लामपूर येथून होणार असून सरकारचे कोणतेही कर, वीज बिल शेतकरी भरणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अतुल दिघे, अॅड. माणिक शिंदे, गणेशकाका जगताप, किशोर ढमाले, बाबासाहेब देवकर, आदी उपस्थित होते.
२३ मार्च रोजी हुतात्मा दिन पाळणार
संपतराव पवार म्हणाले, कर्जबाजारीपणाला कंटाळून १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे या शेतकºयाने विष प्र्राशन केले. सरकारला याची आठवण करून देण्यासाठी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उपोषण करण्यात येणार आहे. हा दिवस ‘अन्नत्याग दिन’ म्हणून पाळण्यात येणार आहे. त्याचबरोबर २३ मार्च हा ‘शेतकरी हुतात्मा दिवस’
म्हणून पाळण्यात येणार असून, प्रमुख शहरांतून संघर्षयात्रा काढण्यात येणार आहे.