उदगांव आरोग्य केंद्र जागेचा प्रश्न प्रलंबित-मंत्रालयात जागेचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:11 AM2017-11-22T00:11:10+5:302017-11-22T00:14:15+5:30
उदगांव : ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगांव येथे स्थलांतरीत करण्यासाठी शासनाने मंजुरी देऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
संतोष बामणे ।
उदगांव : ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगांव येथे स्थलांतरीत करण्यासाठी शासनाने मंजुरी देऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. तर उदगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाची सुमारे ३३ एकर जागा येथे आहे. मात्र, या साडेचार एकरांच्या जागेसाठी मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यावर उदगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्यात क्षयरोगाच्या उपचारासाठी स्वतंत्र अशी तीन रुग्णालये आहेत. त्यातील एक क्षयरोग रुग्णालय उदगांव येथे गेल्या पन्नास वर्षांपासून स्थापित असून, याठिकाणी अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालय उदगांव गावाजवळ असलेल्या ३३ एकर जागेत आहे. तर ही जागा महाराष्ट्र शासनाच्या नावावर असल्याने अन्य कोणत्याही शासकीय कार्यालयासाठी क्षय रुग्णालयातील जागा वापरता येत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न लांबणीवर पडला आहे. तर उदगांवच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी व साडेचार कोटींचा निधी उपलब्ध असूनही शासकीय काम आणि सहा महिने थांब, असा प्रत्यय उदगांवकरांना सहन करावा लागत आहे.
उदगांव येथील ३३ एकरांची जागा ही एक मोठ्या शेतकºयाने क्षय रुग्णालयासाठी दान स्वरूपात शासनाला दिली होती. तर त्यांनी या जागेवर क्षय रुग्णालायाशिवाय कोणत्याही कामासाठी ही जागा वापराला देऊ नये, अशी अट असल्याने आतापर्यंत रुग्णालयाव्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी जागा वापरलेली नाही. ३३ एकर जागेतील उदगांव-शिरोळ मार्गावरील असलेल्या साडेचार एकरची जागा प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात अडचण नसल्याने कोल्हापूर जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडून पुणे आरोग्य विभाग व मुंबई मंत्रालय यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. या जागेबाबत मंत्रिमंडळात ठराव मंजूर झाल्यावरच उदगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागा मिळणार आहे, हे मात्र नक्की. त्यामुळे उदगांवकराचे डोळे आता मंत्रालयाच्या ठरावाकडे आहेत
लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा
जि.प.चे माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक यांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उदगांव येथे स्थलांतरित करण्यासाठी मंजुरी आणली शिवाय निधीची तरतूदही केली आहे.
जि. प. सदस्य स्वाती सासणे यांनीहीउदगांव आरोग्य केंद्र तत्काळ व्हावेयासाठी आमदार उल्हास पाटील व जिल्हा परिषद पातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे उदगांव प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यासाठी लोकप्रतिधींचा पाठपुरावा सुरू आहे.