राधानगरी तालुक्यात संरक्षण कठडे,रस्त्यांची दुरवस्था- दिशादर्शक फलकांचा अभाव,घाटांना वन्यजीव कायद्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:57 PM2017-12-05T23:57:42+5:302017-12-05T23:58:10+5:30

राधानगरी : डोंगर दºयांनी व्यापलेल्या राधानगरी तालुक्यातील एकूण रस्त्यांपैकी ७५ टक्के रस्ते घाट मार्गाचे आहेत.

Protection of roads in Radhanagari taluka, road disaster - lack of directional boards, barrier to wildlife law hazards | राधानगरी तालुक्यात संरक्षण कठडे,रस्त्यांची दुरवस्था- दिशादर्शक फलकांचा अभाव,घाटांना वन्यजीव कायद्याचा अडथळा

राधानगरी तालुक्यात संरक्षण कठडे,रस्त्यांची दुरवस्था- दिशादर्शक फलकांचा अभाव,घाटांना वन्यजीव कायद्याचा अडथळा

Next

संजय पारकर ।
राधानगरी : डोंगर दऱ्यांनी व्यापलेल्या राधानगरी तालुक्यातील एकूण रस्त्यांपैकी ७५ टक्के रस्ते घाट मार्गाचे आहेत. त्यामुळे येथे होणारी वाहतूक नेहमीच भीतीच्या छायेत असते. काही रस्त्यांचे अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी कठडे नाहीत. कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यातच रस्त्यांची नेहमीच असणारी दुरवस्था यामुळे वारंवार होणारे अपघातही चिंतेची बाब आहे.

राज्य मार्गाचा बराचसा भाग राधानगरी अभयारण्यातून त्याचा फटका रस्ते विकासाला बसतो. येथे अवघड वळणे व रस्त्याकडेने असणारी झाडे-झुडपे यांचा मोठा अडसर वाहतुकीला होतो.
कोल्हापूरहून कोकण, गोव्याला जोडणारा राज्यमार्ग व निपाणी परिसरातील कर्नाटक राज्यातील भागाला कोकणाशी जोडणारा आंतरराज्य मार्ग हे दोन मार्ग गैबी तिट्ट्यापासून एकत्र जोडले आहेत. कोल्हापूरकडून येणाºया परिते-गैबी या २१ कि.मी.च्या रस्त्यात खिंडी व्हरवडे ते गैबी हा घाटमार्ग आहे. निपाणी-देवगड या राज्यमार्गावर सोळांकुरपासून घाट सुरू होतो. तो दाजीपूरपर्यंत, कोल्हापूर हद्दीपर्यंत ३८ कि.मी. व तेथून सिंधुदुर्ग हद्दीतील १२ कि.मी.चा फोंडाघाट असा ५० कि.मी. इतका प्रदीर्घ लांब आहे.

हा संपूर्ण भाग अभयारण्यातून जातो. येथे वन्यजीव कायद्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण करता येत नाही. त्याचा फटका येथील रस्ते विकासाच्या कामांना बसला आहे. रस्त्याला लागूनच मोठी झाडे, झुडपे आहेत. मोठमोठी अवघड वळणे असल्याने समोरून येणारे वाहन लवकर दिसत नाही. या टप्प्यात सतत लहान-मोठे अपघात होतात. मोठ्या दºया आहेत; मात्र बाजूच्या कठड्यांचा अभाव आहे.

बांधकाम विभागाने डिसेंबर २०१४ मध्ये केलेल्या वाहन गणतीत दाजीपूर येथे सप्ताहात ११०७३ मेट्रिक टन व मे २०१५ मध्ये १०३०० मेट्रिक टन भारमान झाले आहे. गैबीतिट्टा येथे डिसेंबर २०१४ मध्ये १४५३८ टन व मे २०१५ मध्ये १०११४ टन वाहतूक झाली आहे. आजमितीस विचार करता कोकणातून चिरे, वाळू व अन्य प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

तालुक्यात मोठ्या वाहतुकीचे नऊ प्रमुख मार्ग आहेत. कोते-धामोड-शिरगाव-तारळे-पडळी-डीगस-दाजीपूर हा ४६ कि.मी.चा मार्ग जवळपास संपूर्ण घाटाचा आहे. म्हासुर्ली-राशिवडे हा १५ कि.मी. घाटमार्ग आहे. आकनूर-तारळे-दुर्गमानवाड-पडसाळी या रस्त्यावर १५ कि.मी.पेक्षा जास्त अवघड घाटमार्ग आहे. सोळांकुर-ऐनी-राजापूर-जळकेवाडी या मार्गात १५ कि.मी. घाटमार्ग व जंगल मार्ग आहे. हा मार्गही अभयारण्यातून जातो. परिणामी, तो अद्यापही बराच प्राथमिक स्थितीत आहे.

बळींची वाढती संख्या
जानेवारी २०१७ पासून या परिसरात जवळपास ३0 अपघात झाले आहेत. यात दोघांचा मृत्यू झाला. सातजण गंभीर व १३ जण किरकोळ जखमी झालेत.
तालुक्यात गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या मार्गांवर सुमारे ८० अपघात झाले आहेत. यात १७ जणांना जीव गमवावा लागला आहे.
त्याचप्रमाणे २७ गंभीर व २५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Web Title: Protection of roads in Radhanagari taluka, road disaster - lack of directional boards, barrier to wildlife law hazards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.