टोकाच्या भूमिकेतून गुंता वाढेल राजू शेट्टी : वारणा योजनेचा वाद,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:30 AM2018-05-19T00:30:41+5:302018-05-19T00:30:41+5:30

शहराला वारणा नदीतून शुद्ध पाणी वाद न करता मिळावे, अशीच माझी स्पष्ट भूमिका आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संघर्षातून काहीच साध्य होणार नसून, समोरासमोर बसून, चर्चा करून तडजोडीअंती

Raju Shetty to increase marginalization of Vedanta | टोकाच्या भूमिकेतून गुंता वाढेल राजू शेट्टी : वारणा योजनेचा वाद,

टोकाच्या भूमिकेतून गुंता वाढेल राजू शेट्टी : वारणा योजनेचा वाद,

Next
ठळक मुद्दे संघर्षाऐवजी समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न

इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून शुद्ध पाणी वाद न करता मिळावे, अशीच माझी स्पष्ट भूमिका आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या संघर्षातून काहीच साध्य होणार नसून, समोरासमोर बसून, चर्चा करून तडजोडीअंती योग्य मार्ग निघावा. सर्वजण टोकाची भूमिका घेत राहिले, तर गुंता वाढत जाईल. संघर्षाऐवजी समन्वयातून मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

इचलकरंजीला मंजूर झालेली अमृत योजना कार्यान्वित करण्यासाठी येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या चक्री उपोषणस्थळी खासदार शेट्टी यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी शेट्टी म्हणाले, वारणा नदीकाठावरील गावांतून होणारा विरोध, त्यावर इचलकरंजी शहरातून सुरू असलेला संघर्ष यातून मार्ग निघण्याऐवजी गुंता वाढत चालला आहे. सरकार स्तरावर दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून त्यामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊन योग्य मार्ग निघेल. यासंदर्भात दानोळी (ता. शिरोळ) येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी गुरुवारी (दि. १७) भेट देऊन त्यांच्याशीही चर्चा केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

२२ मे रोजी होणाºया मुंबईतील बैठकीस आंदोलनकर्ते व ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे. यावेळी इचलकरंजीकरांची भूमिका व सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी माहिती दिली. तसेच अजित जाधव, दिलीप माणगावकर, सागर चाळके, बंडा मुसळे, आदींची भाषणे झाली. नितीन जांभळे यांनी आभार मानले.

उपोषणाचा चौथा दिवस
इचलकरंजीत प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या चक्री उपोषणास शुक्रवारी नगरसेविका मंगल मुसळे, बंडोपंत मुसळे, मिरासाहेब गैबान, फैय्याज गैबान, सुनील शिंदे, प्रमोद येटाळे, आदींसह परिसरातील नागरिक, सामाजिक संस्था संघटनांचे कार्यकर्ते बसले होते. दरम्यान, सप्तरंग कला मंच, मी स्वाभिमानी यंत्रमागधारक संघटना, आदींसह विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

आत्मदहन करू
पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे यांनी आभार मानण्यापूर्वी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार शेट्टी यांना दोन्हीकडची भूमिका समजावून घेऊन वारणा नदीकाठच्या नागरिकांचे गैरसमज दूर करून २२ मेपर्यंत तोडगा काढावा; अन्यथा गरज वाटल्यास आपण आत्मदहन करण्यासही मागे हटणार नाही, अशी भूमिका व्यक्त केली.

मोठा पोलीस बंदोबस्त
खासदार राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात दोन्हीही भाग येत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत सोशल मीडियावरून उलट-सुलट चर्चा होती. यातून काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, तीन पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस असा बंदोबस्त तैनात होता

इचलकरंजीत वारणा नदीतील पाण्यासाठी सुरू असलेल्या चक्री उपोषणस्थळी भेट देऊन खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नितीन जांभळे, मंगल मुसळे, नगराध्यक्षा अलका स्वामी, सागर चाळके, मनोज हिंगमिरे, मदन झोरे, सुनील महाजन, सतीश डाळ्या, अशोक स्वामी, रवींद्र माने, आदी उपस्थित होते.

Web Title: Raju Shetty to increase marginalization of Vedanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.