बटालियनमध्येच होत होती जवानांची लूट : अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:15 AM2018-07-18T01:15:28+5:302018-07-18T01:15:35+5:30

 The robbery of the soldiers was being carried out in the battalion: the corrupt administration of the officers | बटालियनमध्येच होत होती जवानांची लूट : अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार

बटालियनमध्येच होत होती जवानांची लूट : अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार

Next
ठळक मुद्दे अनेक वर्षांपासून सुरू होता गैरव्यवहार

दीपक जाधव ।
कोल्हापूर : नागरिकांच्या सुरक्षेवर भर देण्याऐवजी आपल्याच कार्यालयातील जवानांना लुटण्याचा भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या अधिकाºयांचा प्रताप लाचलुचपत विभागाच्या कारवाईने उजेडात आला आहे. जवानांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी या विभागाच्या महासंचालक अर्चना त्यागी यांच्याकडे झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरिक्त महासंचालक संदीप कर्णिक यांनीही कोल्हापुरात येऊन त्यासंबंधीची चौकशी केली होती तरीही अधिकाºयांना त्याची कोणतीही भीती वाटत नव्हती हे विशेष.

भारतीय राखीव बटालियन क्रमांक तीनचा कारभार सुरुवातीपासून वादग्रस्त आहे. येथील समादेशकाच्या हाताखालच्या टोळीकडून जवानांची पिळवणूक होत होती. ड्यूटी न लावणे, रजा देण्यासाठीही पैशांची मागणी येथे केली जात असे. जवानांकडून प्रत्येक कामात पैसा घेतला जात असल्याने ते हतबल झाले होते. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतून पैसा गोळा करणे इतकेच काम ही टोळी करीत होती. ‘पैसा देईल त्याचेच काम’ असा इथला कारभार होता अशी चर्चा सुरु होती.
जिथे नक्षलवाद्यांचा प्रभाव अधिक आहे, त्या ठिकाणी बटालियन कार्यरत असते. मात्र, या दलातील समादेशकांकडून जवानांची आर्थिक पिळवणूक होत आहे. बाहेर बदली नको असेल तर महिन्याला पाच हजार रुपये मोजावे लागतील, असा सज्जड दमही जवानांना दिला जात होता. जवानांसाठी स्वतंत्र खानावळ आहे. मात्र, त्याठिकाणी कधीही जेवण दिले जात नाही. उलट जवानांकडूनच दर महिन्याला २५०० रुपये घेतले जातात. त्याचा हिशेब मात्र कुठेच कागदोपत्री दिसत नाही. हे पैसे नेमके जातात कुठे याचा शोध अद्यापही लागलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी ‘वर्ग चार’च्या कर्मचाºयांकडून पदोन्नतीचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये काढले होते. पैसे देऊनही पदोन्नत्या मिळालेल्या नाहीत. एखादा कर्मचारी वैद्यकीय रजा घेवून हजर होणार असेल तर पाच हजार रुपये घेऊन मुंबई गाठायची. याठिकाणी बसलेल्या समुपदेशकाला पैसे द्यायचे. या समुपदेशकाचे कार्यालयात कमी आणि मुंबईत जास्त वास्तव्य आहे.

चर्चा लग्नाची
बटालियनमधील एका वरिष्ठ अधिकाºयाच्या मुलाचे लग्न जळगावमध्ये झाले. त्यासाठी दौंड, मुंबई, गडचिरोली, कर्नाटक आणि कोल्हापुरातून रसद पुरविण्यात आली होती. त्याची चर्चा राज्यभर झाली.

अलिखित रेटकार्ड
चालक प्रशिक्षण - १० हजार रुपये
आर्मर प्रशिक्षणासाठी - ७० हजार रुपये
गैरहजर राहिल्यास- ५ हजार रुपये
खानावळ - २५०० रुपये
हजेरी सवलत - १०० ते १ हजार

Web Title:  The robbery of the soldiers was being carried out in the battalion: the corrupt administration of the officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.