हिरण्यकेशीत कपडे..चप्पल ओढ्यात! आरोपीकडून कपड्यांचीही विल्हेवाट भडगाव शिक्षक खून प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:26 AM2017-12-05T01:26:02+5:302017-12-05T01:27:40+5:30

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश चोथे याने खुनाच्या घटनेनंतर आपल्या अंगावरील रक्ताने माखलेले जर्कीन व शर्ट भडगाव पुलानजीक हिरण्यकेशी नदीत,

    Rusty clothes. Bhadgaon teacher murder case discharged from accused | हिरण्यकेशीत कपडे..चप्पल ओढ्यात! आरोपीकडून कपड्यांचीही विल्हेवाट भडगाव शिक्षक खून प्रकरण

हिरण्यकेशीत कपडे..चप्पल ओढ्यात! आरोपीकडून कपड्यांचीही विल्हेवाट भडगाव शिक्षक खून प्रकरण

Next

गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश चोथे याने खुनाच्या घटनेनंतर आपल्या अंगावरील रक्ताने माखलेले जर्कीन व शर्ट भडगाव पुलानजीक हिरण्यकेशी नदीत, तर आपल्या कमरेचा बेल्ट व चप्पल कडगाव रोडवरील ओढ्यात टाकल्याची माहिती पोलिसांना चौकशीत दिली. त्यामुळे आरोपीच्या कपडे, बेल्ट व चप्पलच्या शोधार्थ सावंतवाडी पोलिसांचे पथक सोमवारी आरोपीसह गडहिंग्लजला आले होते.

सकाळी ११च्या सुमारास सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या नेतृत्वाखाली पथक गडहिंग्लजला आले. त्यांनी येथील नगरपालिकेकडील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाºयांच्या सहकार्याने यांत्रिक बोटीने भडगाव पुलाच्या दोन्ही बाजूस ‘सुरेश’च्या कपड्यांचा शोध घेतला. तसेच कडगाव रोडवरील ओढ्यावर जाऊन चप्पल व बेल्टची शोधाशोध केली. तब्बल तासभर ही शोधमोहीम सुरू होती. मात्र, यापैकी एकही वस्तू त्यांच्या हाती लागली नाही.

६ नोव्हेंबरला रात्री ११ च्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या विजयकुमार गुरव यांचा खून त्यांच्याच घरातील बेडरूममध्ये केल्याची कबुली आरोपी सुरेश चोथे व विजयकुमारची पत्नी जयलक्ष्मी हिने अटकेनंतर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना घटनास्थळी आणून रीतसर पंचनामाही केला.
दरम्यान, आरोपीने मृतदेहासोबत कावळेसादच्या दरीत टाकलेली गादी व उशी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी सुरेश याने घटनेच्या दिवशी वापरलेल्या वस्तू नदी व ओढ्यात फेकून दिल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ‘त्या’ वस्तू हस्तगत करण्यासाठी सावंतवाडी पोलीस गडहिंग्लजला आले होते.

गादी, ‘उशी’, ‘रॉड’ अन् गाडी हस्तगत!
मृत विजयकुमार गुरव हे त्या दिवशी ज्या गादीवर झोपले होते, त्याच गादीवर ‘उशी’ने तोंड दाबून त्यांच्या डोक्यावर लोखंडी ‘रॉड’ने अनेक प्रहार करून खून केल्याचे आणि मृतदेहासोबत ‘ती’ ‘गादी व उशी’देखील कावळेसादच्या दरीत फेकून दिल्याचे आरोपी सुरेशने पोलिसांना सांगितले आहे. सुमारे दोन हजार फूट खोल दरीतून ‘ती’ गादी व उशी पोलिसांनी हस्तगत केली असून, दोन्ही वस्तू रक्ताने भिजल्या आहेत. खुनासाठी वापरलेला ‘रॉड’ आणि मृतदेह टाकण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

Web Title:     Rusty clothes. Bhadgaon teacher murder case discharged from accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.