कर्तव्यावर हजर न राहणाऱ्या एस. टी. चालक-वाहकांचे परवाने रद्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 10:38 AM2017-10-19T10:38:30+5:302017-10-19T10:55:27+5:30
एस. टी. महामंडळातील चालक आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. जे कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ ला अधिन राहून चालकांचे परवाने व वाहकांचे बॅज रद्द करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार दिला.
कोल्हापूर, दि. १९ : एस. टी. महामंडळातील चालक आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. जे कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ ला अधिन राहून एस. टी. चालकांचे परवाने व वाहकांचे बॅज रद्द करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार दिला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर परिवहन मंत्र्यांसोबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळसणात सलग तिसऱ्या दिवशी सर्वसामान्य जनतेचे हाल होणार आहेत.
तिन दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे एस. टी. महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद आदी ठिकाणांहून आलेल्या प्रवाशांच्या पुढील प्रवासाकरीता खासगी बसेस, टेम्पो, ट्रॅक्स व्यावसायिकांचे साहाय्य घेण्यात आले आहे.
ही यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे मोटार वाहन कायद्यानुसार एस. टी. महामंडळाची बससेवाही त्यात मोडते. त्यामुळे या कायद्यानुसार महामंडळाचे जे चालक, वाहक तत्काळ कामावर रूजू होणार नाहीत. त्याच्यावर लायसेन्स (परवाने), कंडक्टर बॅज रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार त्याचा वापर केला जाणार आहे.
सद्य:स्थितीत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली महामंडळास सहाय करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यात कोल्हापूर-करवीर- मुबारक उचगांवर, प्रशांत जाधव, गडहिंग्लज- चंदगड- हृषीकेश कोराणे, अमित गुरव, शिरोळ -हातकणंगले- सुरेश माळी , मलकापूर, शाहूवाडी- पन्हाळा- जितेंद्र पाटील, आजरा-गारगोटी - अमर भंडारे, अश्विनी कुमार , राधानगरी - गगनबावडा - सागर विश्वासराव, सुनील राजमाने, कागल - रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. त्या त्या डेपो नियंत्रकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे डॉ. पवार यांनी आवाहन केले आहे.
के.एम.टी.लाही जिल्हाभरात प्रवासी ने-आण मुभा
एस. टी. महामंडळाच्या चालक, वाहकांच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेच्या के.एम.टी. उपक्रमातील बसेसना २० किलोमीटरच्या परिघापासून पुढे जाण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार जिल्हाभरात कुठेही प्रवासी ने-आण करण्याची मुभा दिली आहे. यासह खासगी बसेस, शालेय बसेस, कंपनी मालकीचे बसेस यांनाही बसस्थानकातून तात्पुुरती प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली आहे, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
प्रधान सचिवांचेही व्हीसीद्वारे आदेश
प्रवाशांच्या सुविधेसाठी जिल्ह्यातील खासगी व सार्वजनिक वाहतूक वाहनांमधून जास्तीत जास्त प्रवाशांची सोय करावी. त्यात महामंडळ व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यात समन्वय साधून करावे. यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अनुषंगिक नियम कलम ३०, ३३, ३४ व ४१ अन्वये कार्यवाही करण्यात यावी, असे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे प्रधान सचिवांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व अन्य अधिकाºयांना निर्देश दिले.