पाच कारखान्यांची साखर जप्त करा; आयुक्तांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:05 AM2018-04-17T01:05:15+5:302018-04-17T01:05:15+5:30
कोल्हापूर : कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’, ‘पंचगंगा’, तर सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली
कोल्हापूर : कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत न देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वारणा’, ‘भोगावती’, ‘पंचगंगा’, तर सांगली जिल्ह्यातील ‘माणगंगा’, ‘महाकाली’
साखर कारखान्यांची साखर जप्तकरण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सोमवारी दिले.
कारखान्यांचे हंगाम संपून महिना-दीड महिना झाला तरी अद्याप शेतकºयांना एफआरपीप्रमाणे पैसे दिलेले नाहीत. याबाबत अनेक वेळा ‘अंकुश’ संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे दाद मागितली तरीही कारखानदार हलत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी सोमवारी आयुक्तांच्या दारात ठिय्या मांडला. त्याची दखल घेऊन कारवाईचे आदेश काढण्यात आले.
ऊस बिले वेळेत न दिल्याचे प्रकरण
अशी आहे थकबाकी
मार्च २०१८ अखेर ‘वारणा’ कारखान्याकडून ११५ कोटी ९२ लाख रुपये, ‘भोगावती’कडे ५१.५ कोटी, ‘पंचगंगा’ (रेणुका शुगर्स) कडे ६२.५ कोटी, ‘माणगंगा’कडे ११ कोटी १९ लाख १५ हजार, तर ‘महाकाली’ कडे २३ कोटी ३ लाख ४२ हजार रुपये थकीत आहेत.
च्कलम ३ (३ ए)नुसार त्यावर विहीत दराने देय होणारे व्याजासह कारखान्यांकडून जमीन महसुलाची थकबाकी समूजन उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस, बगॅस, आदी उत्पादनांची विक्री करावी. आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या स्वत:च्या जंगम व स्थावर मालमत्तेची विहित पद्धतीद्वारे विक्री करून या रकमेतून ऊस पुरवठादारांना अदा करण्यात यावे, असे आदेश साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.