शिरोळ, राजापूर बंधारे पाण्याखाली, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 02:24 PM2021-06-17T14:24:37+5:302021-06-17T14:26:15+5:30
Rain Kolhapur : शिरोळ तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णेसह, पंचगंगा, वारणा, दुधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधारा व कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
Next
ठळक मुद्देशिरोळ, राजापूर बंधारे पाण्याखाली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
शिरोळ : तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णेसह, पंचगंगा, वारणा, दुधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधारा व कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
नदीकाठची गवती कुरणे पाण्याखाली गेल्याने ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिले असून शेतीची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, शिरोळ बंधाऱ्यात अडकलेली जलपर्णी मात्र यामुळे वाहुन गेल्याने पंचगंगेच्या पात्राने मोकळा श्वास घेतला आहे.